जुन्हा फाटक्या नोटा कोणत्याही बँकेत बदलता येणार


जुन्या, फाटक्या, मळक्या नोटा घेण्यास दुकानदार अनेकदा खळखळ करतात आणि अश्या नोटांचे काय करायचे असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना भेडसावतो. आता रिझर्व बँक ऑफ इंडियाने नोट रिफंड रूल २०१९ नुसार केलेल्या सुधारणेमुळे जुन्या नोटा बदलून देण्यास बँका नकार देऊ शकणार नाहीत. अर्थात त्यातून पेमेंट बँका आणि स्मॉल फायनान्स कंपन्यांना सुट दिली गेली आहे. म्हणजे या संस्था त्यांच्या सोयीने जुन्या फाटक्या नोटा बदलून देऊ शकतील.

समजा एकाद्या ठिकाणी नोट रिफंड रुल २०१९ प्रमाणे नोटा बदलून देण्यास नकार दिला गेला तर देशभरात रिझर्व बँकेच्या २१ प्रादेशिक तसेच ११ उपप्रादेशिक कार्यालयात या नोटा बदलून घेता येणार आहेत. नोटेचा किती भाग सुरक्षित आहे त्यावर रिफंड किती मिळणार याचे प्रमाण निश्चित केले गेले आहे. या योजेनेखाली १,२,५,१०,२०,५०,१००,२००,५०० व २००० रुपयांच्या नोटा बदलुन घेता येतील.

नवीन नियमानुसार २ हजाराच्या नोटेच्या एकूण चौरस सेंटीमीटर आकारापैकी ८८ टक्के भाग शिल्लक असेल तर पूर्ण रक्कम मिळेल मात्र ४४ टक्क्यापेक्षा अधिक भाग खराब असेल तर निम्मी रक्कम मिळणार आहे. प्रत्येक नोटेसाठी हे प्रमाण वेगळे आहे कारण नोटांचे आकार भिन्न आहेत. त्यानुसार ५०० रु.च्या नोटेच्या ९९ चौरस सेंटीमीटरपैकी ८० चौ.सेंटीमीटर सुरक्षित असले तर पूर्ण रक्कम मिळेल.

Leave a Comment