ही महिला आहे विराटची खरी फिटनेस गुरु


टीम इंडियाचा कप्तान विराट कोहलीने फिट खेळाडू कसा असावा याचा आदर्श निर्माण केला असून त्याचे अनुकरण आज अनेक युवा खेळाडू करताना दिसत आहेत. मात्र विराटच्या या जबरदस्त फिटनेस मागे एका महिलेचा हात आहे याची अनेकांना कल्पना नही. प्रथमच खुलासा करायला हवा की ही महिला विराट पत्नी अनुष्का नाही तर ती आहे विराटचा सहयोगी खेळाडू दिनेश कार्तिक याची पत्नी दीपिका पल्लीवाल. दीपिका भारताची नंबर एकची स्क्वॅश खेळाडू आहे.

माजी ट्रेनर शंकर बसू यांनी या गोष्टीचा खुलासा केला आहे. ते म्हणाले विराटने फिटनेसची प्रेरणा दीपिका पासून घेतली आणि स्वतःच्या फिटनेसवर काम सुरु केले. अर्थात विराटने हे कधीच मोकळेपणाने सांगितले नसले तरी हेच सत्य आहे. दीपिका स्वतः फिटनेस बाबत अतिशय कॉन्शस आहे. प्रथम तिनेच विराटला फिटनेस राख असे सांगितले होते. तिच्या सांगण्याचा विराटवर इतका प्रभाव पडला की दुसऱ्याच दिवसापासून त्याने फिटनेसवर काम सुरु केले.

बसू म्हणाले सुरवातीला क्रिकेटपटू आयपीएल दरम्यान उन्हाळ्यात ट्रेनिंग घेत असत. पण विराटने जेव्हा दीपिकाचे हेवी वर्कआउट ट्रेनिंग पहिले तेव्हा तो चकित झाला. कारण दीपिकाचा फिटनेसचा स्तर कमालीचा होता. तेव्हाच विराटने बसू याना आपणही नियमित हे ट्रेनिंग का घेत नाही असे विचारून ट्रेनिंगला सुरवात केली आणि त्याचा परिणाम आज दिसतो आहे. जगभरातील खेळाडू वर्कलोड मॅनेज करण्याची कसरत करत असताना विराट मात्र क्रिकेटच्या तिन्ही फॉर्म मध्ये उत्तम कामगिरी बजावतो आहे. विराटने मांसाहार सोडला असून तो वेगन बनला आहे.

Leave a Comment