नव्या वर्षात क्रिकेटवर आधारित चित्रपटांची गर्दी


(सोर्स कोईमोई.कॉम)
नवे २०२० साल सुरु होण्यास आता काही दिवस राहिले आहेत. या नव्या वर्षाचे स्वागत अनेक बड्या चित्रपटाच्या प्रदर्शनाने होणार असले तरी यंदा क्रिकेट या विषयावरचे अनेक चित्रपट रिलीज होत आहेत. त्यात प्रमुख आहे तो १९८३ चा वर्ल्ड कप भारताने कपिल देवच्या नेतृत्वाखाली जिंकला त्या विषयावरचा ८३ या नावाचा चित्रपट. यात रणवीर कपूर कपिल देवच्या भूमिकेत असून या चित्रपटाविषयी आत्ताच रसिकांना मोठी उत्सुकता लागली आहे.

दुसरा चित्रपट आहे शहीद कपूर अभिनीत जर्सी. हा चित्रपट गौतम रींनापुरीच्या तेलगु चित्रपटाचा रिमेक आहे. मूळ तेलगु चित्रपटात नानी हिरो होता. एका असफल क्रिकेटपटूचा संघर्ष दाखविणारा हा एक इमोशनल चित्रपट आहे. महिला क्रिकेट टीमची कप्तान मिताली राज हिच्यावर काढला गेलेला चित्रपट याच नव्या वर्षात रिलीज होत असून त्यात मितालीची भूमिका तापसी पन्नू साकारत आहे. शिवाय सचिनच्या वाढदिवशी गॉड ऑफ क्रिकेट या नावाने चित्रपट बनविला जात असल्याची घोषणा केली गेली आहेच.

क्रिकेट या विषयावर यापूर्वीही अनेक चित्रपट बनले आहेत. आमीर खानच्या लगान मध्ये क्रिकेटचा रोमांच होता तसेच पतियाला हाउस, इक्बाल, जन्नत या नावाचे चित्रपट क्रिकेट विषयावर होते. माजी कप्तान अझरुद्दीन तसेच एमएस धोनी याच्यावरही चित्रपट बनले आहेत. सचिन तेंडूलकर याच्यावरही चित्रपट बनविला गेला आहे.

Leave a Comment