अशी झाली ब्लॅक फ्रायडे सेलची सुरवात


सध्या इंटरनेटवर अनेक बड्या कंपन्या ब्लॅक फ्रायडे सेलच्या जाहिराती करत असून या सेल मधून प्रचंड प्रमाणावर डिस्काऊंट दिले जात आहेत. ब्लॅक फ्रायडे सेल म्हणजे नक्की काय, त्याची सुरवात कधी झाली आणि हा सेल का लावला जातो याची अनेकांना माहिती नसेल. प्रथमच स्पष्ट केले पाहिजे की ब्लॅक फ्रायडे सेल ही परदेशी संकल्पना आहे.

ब्लॅक फ्रायडे सेल दिवशी अमेरिकेत प्रचंड मोठ्या प्रमाणावर खरेदी केली जाते. याचा प्रथम वापर २४ सप्टेंबर १८६९ मध्ये केला गेल्याचे सांगितले जाते. तेव्हा दोन गुंतवणूकदारांनी न्युयॉर्क स्टॉक एक्स्चेंजचे प्रचंड सोने मोठ्या प्रमाणात खरेदी केले. त्यामागे त्यांचा उद्देश सोने भाव वाढावे असा होता पण सरकारने वेळीच बाजारात मुबलक सोने उपलब्ध केल्याने उलट सोन्याचे भाव कोसळले आणि गुंतवणूकदारांना प्रचंड नुकसान सोसावे लागले होते.

यामुळे जगभरातील अनेक देश हा ब्लॅक फ्रायडे सेल अजिबात खरेदी न करण्याचा दिवस म्हणून साजरा करतात. काही देशात या प्रसंगी क्रेडीट कार्ड जाळली जातात त्यामागे या सेलला विरोध हाच हेतू असतो. जगभरात जपान, नेदरलँड्स. फ्रांस, नॉर्वे, युके सह ६५ देशात ब्लॅक फ्रायडे सेलला विरोध केला जातो आणि या दिवशी खरेदी केली जात नही.


सोर्स- इंडिया टुडे
एका रिपोर्टनुसार हा दिवस अमेरिकेतील प्लंबरना फार धावपळीचा असतो. रोटो रुटेर या प्लंबिंग क्षेत्रातील कंपनीच्या म्हणण्यानुसार या दिवशी त्यांचा बिझिनेस ५० टक्के वाढतो. ब्लॅक फ्रायडे सेलच्या अगोदरच्या दिवशी म्हणजे थँक्स गिव्हिंगच्या वेळी अमेरिकी राष्ट्रपती भाषण देतात. अब्राहम लिंकन यांनी असे पहिले भाषण दिले होते. ब्लॅक फ्रायडे सेलचा उगम फिलाडेल्फिया येथील आहे असे मानतात. येथे थँक्स गिव्हिंगच्या दुसऱ्या दिवशी लोक रस्त्यावर शॉपिंग साठी प्रचंड गर्दी करतात त्याचा पोलिसांना त्रास होतो म्हणून त्यानीच या दिवसाला हे नाव दिले आहे.

आकडेवारी सांगते, ब्लॅक फ्रायडे सेल साठी ५० टक्के अमेरिकन ऑनलाईन शॉपिंग करण्याची तयारी अगोदर पासून करतात. यंदा हा दिवस २९ नोव्हेंबरला होता मात्र अनेक कंपन्या त्या अगोदर आणि नंतर पुढे काही दिवस हे सेल सुरु ठेवतात.

Leave a Comment