… म्हणून डॉक्टरांनी महिलेसाठी हाताच्या त्वचेपासून तयार केली जीभ

(Source)

यूकेमध्ये एका 36 वर्षीय महिलेला जीभेचा कॅन्सर होता. यासाठी डॉक्टरांना त्या महिलेची जीभ कापावी लागली. मात्र डॉक्टरांनी त्या महिलेला पुन्हा जीभ लावली. ती देखील त्या महिलेच्या हाताच्या त्वचेपासून बनविण्यात आली होती.

बकिंगहमशायर येथे राहणाऱ्या स्टेफनी विग्लवोर्ट यांना अनेक दिवसांपासून जीभेचा कॅन्सर होता. डॉक्टरांनी यासाठी सर्जरी करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी जीभेला ज्या ठिकाणी कॅन्सर होता, तो भाग कापला.

डॉक्टरांनी त्यांची मानेतून सर्जरी केली. तेथून त्यांनी जीभेचा तो भाग कापला व नवीन जीभ लावली. ज्यासाठी महिलेच्या हाताच्या त्वचेचा वापर करण्यात आला. या पुर्ण सर्जरीसाठी 4 ते 5 तास लागले. सर्जरी यशस्वी झाली. मात्र आता या महिलेचा आवाज आधीसारखा राहिलेला नाही.

स्टेफनी यांनी सांगितले की, जीभेसाठी हाताच्या ज्या भागातून त्वचा घेण्यात आली तेथे जीभेपेक्षा अधिक त्रास होत आहे.  माझ्या मित्रांना माहिती आहे की, मी एक सकारात्मक विचार करणारी महिला आहे. मला माझा आवाज पुन्हा पाहिजे, पण असे होणार नाही हे मला माहिती आहे. मी एक स्मोकर होते, माझ्या बरोबर हे घडणारच होते. मी आता केवळ आपल्या कुटूंबाबरोबर राहू इच्छिते.

Leave a Comment