4 रिअर कॅमेरे असणारा व्हिवोचा दमदार फोन भारतीय बाजारात दाखल

चीनची स्मार्टफोन कंपनी व्हिवोने आपला नवीन स्मार्टफोन व्हिवो व्ही17 भारतीय बाजारात लाँच केला आहे. या स्मार्टफोनमध्ये 4 रिअर कॅमेरे देण्यात आलेले आहे. फूल व्ह्यू डिस्प्ले असणाऱ्या या फोनमध्ये सेल्फीसाठी पंचहोल कॅमेरा देण्यात आला आहे. याआधी कंपनीने भारतात व्हिवो व्ही17 प्रो लाँच केला होता, त्यात ड्यूअल पॉप अप सेल्फी कॅमेरा दिला होता.

व्हिवो व्ही17 ची किंमत 22,900 रुपये आहे. फ्लिपकार्ट आणि अमेझॉनवरून 17 डिसेंबरपासून हा फोन खरेदी करू शकता. याची ऑफलाईन देखील विक्री केली जाईल.

(Source)

या स्मार्टफोनमध्ये 6.44 इंचचा फूल एचडी+ सूपर एमोलेड डिस्प्ले मिळेल. हा फोन क्वॉलकॉम सुपरड्रॅगन 675 AIE प्रोसेसरवर चालेल. यात 8 जीबी रॅम + 128 जीबी इंटर्नल स्टोरेज मिळेल.

या स्मार्टफोनमध्ये अँड्राईड 9 पायवरील ऑपरेटिंग सिस्टम Funtounc OS 9.2 देण्यात आले आहे. हा स्मार्टफोन मिडनाइट ब्लॅक आणि ग्लेशियर वाइट रंगात लाँच करण्यात आला आहे. यामध्ये अंडर डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनरसोबत फेसलॉक फिचर मिळेल, जे सेल्फी कॅमेरा बेस्ड आहे.

(Source)

व्हिवो व्ही17 मध्ये फोटोग्राफीसाठी क्वॉड रिअर कॅमेरा सपोर्ट मिळेल. याचा प्रायमेरी कॅमेरा 48 मेगापिक्सल आहे. याशिवाय 8 मेगापिक्सलचा दुसरा कॅमेरा आहे व दोन कॅमेरे 2-2 मेगापिक्सलचे आहेत. सेल्फीसाठी यात 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळेल.

या फोनमध्ये 4,500mAh ची बॅटरी मिळेल. जी 18 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसोबत येते. याशिवाय कनेक्टिव्हिटीसाठी यात यूएसबी टाइप सी, हेडफोन जॅक, ब्लूटूथ 5.0, जीपीएस, ओटीजी, वाय-फाय हे फीचर्स मिळतील.

 

Leave a Comment