‘आइस बकेट चॅलेंज’ लोकप्रिय करणाऱ्या पीट फ्रेट्सचे निधन

(Source)

जगभरात ‘आइस बकेट चॅलेंज’ लोकप्रिय करणाऱ्या माजी अमेरिकन कॉलेज बेसबॉलपटू पीट फ्रेट्सचे वयाच्या 34 व्या वर्षी निधन झाले आहे. त्याला न्यूरोजेनेरेटिव्ह हा आजार होता. याशिवाय पिटाला लू गेहरिंग डिजीज देखील होते. 2014 मध्ये आइस बकेट चँलेंज लोकप्रिय करण्यामध्ये पिटाचा मोठा वाटा होता.

या चॅलेंजमध्ये जगभरातील लाखो लोकांनी सहभाग घेतला होता व आपले व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केले होते. या चॅलेंजचा उद्देश मेडिकल रिसर्चसाठी फंड जमा करणे हा होता.

या लोकप्रिय चॅलेंजमध्ये अभिनेता टॉम क्रुझ, स्टिव्हन स्पिलबर्ग, बिल गेट्स आणि अमेरिकेचे माजी राष्ट्रपती जॉर्ज बुश यांनी देखील सहभाग घेतला होता.

या कॅम्पेनद्वारे जवळपास 200 मिलियन डॉलर फंड जमा केला गेला. या पैशांचा वापर मेडिकल रिसर्चसाठी करण्यात येत आहे.

पीटचे कुटूंब म्हणाले की, पीटने आपल्या या आजाराबद्दल कधीच तक्रार केली नाही. उलट त्याने या गोष्टीला दुसऱ्या पिडितांना आणि त्यांच्या कुटूंबाला आशा व हिम्मत देण्याच्या दृष्टीने पाहिले.

Leave a Comment