मूळ दक्षिण आफ्रिकेचे असलेले 53 वर्षीय माइक हॉर्न आणि नॉर्वेचे असलेले 57 वर्षीय बोर्ज ऑसलँड यांनी स्कीईंगद्वारे यशस्वीरित्या आर्कटिक महासागर पार केला आहे. दोघांना 25 ऑगस्टला अलास्काजवळ एका बोटीच्या मदतीने सोडण्यात आले होते.
12 डिसेंबरला दोघांनी या प्रवासास सुरूवात केली. त्यांच्या जवळ सामानाने भरलेली एक स्लेज गाडी होती, जी त्यांनाच ओढायची होती. आपल्या या प्रवासात त्यांना थंडी, खाण्याची कमतरता आणि ग्लोबल वॉर्मिंगमुळे पातळ झालेली बर्फाची चादर या गोष्टींचा सामना करावा लागला.
या अभियानाचे प्रवक्ता लार्स एबसेन यांच्यानुसार, या दोघांनी 27 ऑक्टोंबरला उत्तर ध्रुव पार केला. दोघांनी प्रवास यशस्वीरित्या पुर्ण करत लॉस आयसब्रेकर शिपपर्यंत पोहचले.
लार्स एबसेन यांनी सांगितले की, दोघेही आधीच्या तुलनेत आता अधिक चांगले आहेत व आराम करत आहेत. या प्रवास नोव्हेंबर महिन्यातच पुर्ण होणार होता, मात्र याला पुर्ण करण्यासाठी 87 दिवस लागले. या प्रवासाच्या अंतिम आठवड्यात दोघांजवळील जेवण पुर्णपणे संपले होते.
या प्रवासा दरम्यान दोघांनी दररोज 15 किमी चालण्याचे लक्ष्य ठेवले होते, जे सुरूवातीला योग्यरित्या पार पडले. त्यांना वाटत होते की 10-12 दिवस आधीच आर्कटिक पार होईल. मात्र वेगवान वाऱ्यामुळे अनेक अडचणी आल्या व ते दिवसाला 3 ते 5 किमीच चालत असे.