भूकंपग्रस्तांसाठी इंग्लंड ते नेपाळ अंतर धावत पुर्ण करत आहे ही 73 वर्षीय महिला

(Source)

ब्रिटनच्या 73 वर्षीय रोजी स्वेल पोप इंग्लंडवरून नेपाळ हे अंतर धावत पुर्ण करत आहेत. जेणेकरून फंड जमा करून त्या भूकंपग्रस्तांना मदत करू शकतील. त्या मागील रविवारी इंस्तांबूल येथे पोहचल्या. त्यांनी सांगितले की, 2018 मध्ये ‘रन रोजी रन’ या कॅम्पेन अंतर्गत त्यांनी जगभरात धावण्यास सुरूवात केली. त्यांनी आतापर्यंत 12 देश पार केले आहेत.

रोजी म्हणाल्या की, मला माहित नसते की, मी कोणत्या रात्री कोठे झोपेल. मी कधी मैदानात झोपते, कधीत एखाद्या गल्लीत. सकाळी उठते आणि धावण्यास सुरूवात करते. मी त्या लोकांना भेटते, ज्यांना मी परत कधीच भेटू शकत नाही.

रोजी यांचा पुढील स्टॉप जॉर्जिया असेल. त्या दररोज 20 किमी धावतात व लोकांकडे मदत मागतात. त्या एक ट्रॉली बांधून धावतात, ज्यात त्यांच्या गरजेचे सर्व सामान आहे.

आपल्या या प्रवासाबद्दल त्या सांगतात की, हे आयुष्याला अधिक काहीतरी देण्यासारखे आहे. कारण तुम्ही जगात येता आणि याच्या बाहेरचा विचारच करत नाही.

रोजी 2004 मध्ये देखील पैसे जमवण्यासाठी जगभरात धावल्या होत्या. 2015 मध्ये त्या संपुर्ण अमेरिकेत धावल्या. एवढेच नाहीतर यूके ते यूएस हा प्रवास त्यांनी 17 फूट बोटीतून केला. त्यांचे दिवंगत पती क्लाइव यांच्या सन्मानार्थ त्यांनी न्यूयॉर्क ते सॅन फ्रॅन्सिस्को असा धावत प्रवास केला होता.

Leave a Comment