गुणांचा खजिना – घृतकुमारी (अॅलो वेरा/कोरफड)


अॅलो वेरा आपल्या घरामध्ये किंवा ऑफिसमध्ये विनासायास लावता येण्यासारखे असते. आजकाल अॅलो वेराचे आरोग्याच्या दृष्टीने फायदे समोर यावयास लागल्याने रस, जेल अश्या अनेक प्रकारे लोक अॅलो वेराचा उपयोग करताना दिसत आहेत.

दात घासल्यानंतरही दातांमध्ये प्लाक किंवा किटाणू राहतातच. त्यामुळे तोंडामधून क्वचित दुर्गंधी येऊ लागते. ही दुर्गंधी येऊ नये यासाठी माऊथवॉश उपयोगात आणला जातो. अॅलो वेराच्या रसाचा वापर देखील प्राकृतिक माऊथवॉश म्हणून करता येतो. या रसामुळे तोंडातील प्लाक आणि किटाणू दूर होऊन दातांचे आरोग्य चांगले राहते. अॅलो वेराचा वापर माऊथवॉश म्हणून केल्याने हिरड्याही बळकट होतात.

कित्येकदा जेवण जास्त झाल्याने, जेवणाच्या वेळा गडबडल्याने किंवा जास्त तिखट, मसालेदार पदार्थ खाल्ल्याने छातीत जळजळ होत असल्याची भावना होते, किंवा अॅसिडीटी होते. अश्यावेळी अॅलो वराच्या रसाच्या सेवनाने फायदा होतो. या मुळे छातीतील जळजळ दूर होऊन अॅसिडीटी ही कमी होते. तसेच दररोज सकाळी रिकाम्या पोटी अॅलो वेराचा रस कोमट पाण्यातून घेतल्यास पोट साफ होण्यास मदत होते.

केस गळत असल्यास अॅलो वेराचा गर कासांना लावल्याने फायदा होतो. तसेच चेहऱ्यावर उष्णतेमुळे मुरुमे येत असल्यासही अॅलो वराच्या गराने फायदा होतो. या गराने त्वचेचा रंग उजळण्यास व पोत सुधारण्यास मदत होते. त्याचमुळे पुष्कळशा स्कीन क्रीम्समध्ये अॅलो वराच्या गराचा अंश मिसळलेला असतो. अॅलो वेराच्या गराच्या वापराने वयपरत्वे त्वचेवर आलेल्या सुकुत्याही कमी होतात, व त्वचा सुंदर दिसू लागते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment