ईशान्य भारतात उमटले नागरिकत्व विधेयकाचे पडसाद


नवी दिल्ली – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे महत्वकांक्षी विधेयक असलेले नागरिकत्व कायदा सुधारणा विधेयक लोकसभेत 293 मतांनी मंजूर झाल्यानंतर आसाममध्ये याचे पडसाद उमटू लागले आहेत. या विधेयकाचा अनेक विद्यार्थी संघटना आणि लोकांनी निषेध केला. हे आंदोलन मध्यरात्रीपर्यंत सुरू होते. या विधेयकाविरोधात नॉर्थ ईस्ट विद्यार्थी संघटनेने (NESO) ईशान्येकडील राज्यांत १२ तासांच्या बंदची घोषणा केली आहे.

निदर्शक मंगळवारी सकाळापासून रस्त्यावर उतरले आहेत. टायर जाळून त्यांनी रस्ते बंद केले आहेत. गुवाहाटीमध्ये या बंदचा सर्वाधिक परिणाम जाणवत आहे. कलम १४४ राज्यातील अनेक जिल्ह्यांत लागू करण्यात आले आहे. हे विधेयक आज राज्यसभेत मांडले जाणार आहे. राज्यसभेच्या काळात आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

Leave a Comment