बाबा झाला कपिल शर्मा…!


विनोदवीर कपिल शर्मा हा बाप झाला असून त्याच्या घरी एका नव्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. कपिल शर्माची पत्नी गिन्नी छत्रथ हिने एका गोडंस मुलीला जन्म दिला आहे. ही आनंदाची बातमी कपिल शर्माने ट्विट करत आपल्या चाहत्यासोबत शेअर केली आहे. कपिल शर्मा लग्नाच्या वर्षभरातनंतर बाबा झाला आहे. १२ डिसेंबर २०१८ मध्ये गिन्नी आणि कपिल शर्मा विवाहबद्ध झाले होते.

सर्वसामान्य नेटकऱ्यांसह बॉलिवडूमधील कलाकारांनीही कपिल शर्माने ट्विट करत आनंदाची बातमी दिल्यानंतर शुभेच्छा दिल्या. गुरू रंधवा, रकुल प्रीत सिंह, सायना नेहवाल यांचा यामध्ये समावेश आहे. बऱ्याच काळापासून आपल्या लव्ह लाईफबद्दल आपल्या विनोदाने टेलिव्हिजन विश्व गाजवणारा विनोदवीर आणि अभिनेता कपिल शर्मा गुप्तता बाळगून होता. त्याने गिन्नीच्या फोटोसह एक खास ट्विट २०१७ मध्ये करत रिलेशनशिपमध्ये असल्याचे सांगितले होते.

१२ डिसेंबर २०१८ मध्ये गिन्नी आणि कपिल शर्मा विवाहबद्ध झाले होते. या दोघांची भेट पंजाब येथील जलंधरमध्ये महाविद्यालयीन प्रशिक्षण घेत असताना झाली. ‘हस बलिये’ कार्यक्रमात गिन्नी आणि कपिल एकत्र दिसले होते. या कार्यक्रमादरम्यान त्यांच्यात जवळीक निर्माण झाली. या कार्यक्रमात विजेतेपद त्यांना मिळाले नाही. मात्र, त्यांच्या कामाची तेव्हा बरीच प्रशंसा झाली होती.

Leave a Comment