ट्रम्प यांचा दावा खोटा, अवैध प्रवाशाने सेंकदात पार केली यूएस-मॅक्सिको बोर्डर

(Source)

अवैध प्रवाशांना रोखण्यासाठी अमेरिका-मॅक्सिको बॉर्डरवर बनविण्यात आलेली 18 ते 26 फूट भिंतींचा काहीही फायदा होताना दिसत नाही. ही भिंत बनविण्यासाठी तब्बल 1 अब्ज डॉलर खर्च करण्यात आला आहे. सप्टेंबर महिन्यातच ओट्टे मेसामध्येच ट्रम्पने भिंतीसमोर उभे राहून म्हटले होते की, जागतिक स्तरावरील गिर्यारोहकांनी या भिंतीवर चढाई करून दावा केला आहे की, ही त्यांची आतापर्यंतची सर्वात अवघड चढाई आहे. सामान्य प्रवासी ही भिंत चढून जावू शकत नाही. मात्र आता ट्रम्प यांचा हा दावा खोटा ठरला आहे.

कॅलिफोर्नियाच्या उमर ओरनेल्स या फोटो जर्नलिस्टने एक व्हिडीओ अपलोड केला आहे. यामध्ये तीन अवैध प्रवासी 100 डॉलर पेक्षा कमी किंमतीच्या दोरीच्या शिडीच्या मदतीने भिंत पार करताना दिसत आहेत. ट्विटरवर पोस्ट करण्यात आलेल्या या व्हिडीओला आतापर्यंत 11 हजार वेळा रिट्विट करण्यात आले आहे.

व्हिडीओमध्ये दिसत आहे की, प्रवासी काही सेंकदातच यशस्वीरित्या स्टीलची भिंत पार करून जात आहेत. मात्र पेट्रोलिंग पार्टी तेथे येताच दुसरा प्रवासी खाली येतो.

मागील 1 दशकात मॅक्सिकोतून अमेरिकेत घुसखोरी करणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. 2019 मध्ये तब्बल 5800 पेक्षा अवैध प्रवाशांनी मॅक्सिकोतून अमेरिकेत प्रवेश केला आहे.

 

Leave a Comment