जीमेलच्या या खास फीचरमध्ये थेट ईमेलच करता येणार अटॅच - Majha Paper

जीमेलच्या या खास फीचरमध्ये थेट ईमेलच करता येणार अटॅच

(Source)

गुगलने आपली ईमेल सर्विस जीमेलच्या युजर्ससाठी एक खास फीचर आणले आहे. कंपनीने या फीचरला ‘attach an email to an email असे नाव देण्यात आलेले आहे.

आता युजर्सला ईमेल फॉरवर्ड अथवा त्यातील अटॅचमेंट डाउनलोड करण्याची गरज नाही. आता जीमेलमध्ये ईमेल थेट अटॅच करता येणार आहे. थोडक्यात ईमेल फॉरवर्ड करण्याऐवजी थेट दुसऱ्या ईमेलमध्ये जोडून पाठवता येणार आहे.

यामध्ये कितीही ईमेल तुम्ही अटॅच करू शकता. ही फाईल .eml म्हणून दिसेल. यामुळे आता अटॅचमेंट असलेले ईमेल्स थेट पाठवता येणार आहे. त्यांना डाउनलोड करण्याची गरज राहणार नाही.

या खास फीचरविषयी कंपनीने म्हटले आहे की, आम्हाला आलेल्या फीडबॅकमध्ये म्हटले आहे की प्रत्येक ईमेल फॉरवर्ड करण्यापेक्षा एकाच टॉपिक संबंधित ईमेल थेट अटॅच करून पाठवणे अधिक सोपे आहे.

या फीचरमुळे वेगवेगळे ईमेल फॉरवर्ड करत बसण्यापेक्षा, थेट एकाच विषयासंबंधित ईमेल थेट अटॅच करून पाठवता येतील.

Leave a Comment