या सरकारी योजनेमुळे तुम्हाला दर महिन्याला मिळतील 10,000 रुपये

(Source)

केंद्रातील सरकारकडून नागरिकांसाठी अनेक लाभकारी योजना आणण्यात आल्या आहेत. यातील एका योजनेत तुम्ही गुंतवणूक केल्यास तुम्हाला निवृत्तीनंतर पैशांची चिंता करण्याची गरज नाही. कारण तुम्हाला दर महिन्याला 10 हजारापर्यंतची पेंशन मिळेल. या योजनेबद्दल जाणून घेऊया.

या योजनेचे नाव ‘पंतप्रधान वय वंदन योजना’ असे आहे. या योजनेंतर्गत नागरिकांना 10 वर्ष 8 टक्के वार्षिक रिटर्नसह पेंशन दिली जाते. या योजनेंतर्गत पेंशन मासिक, तिमाही, सहामाही आणि वार्षिक आधारावर घेतले जाते. या योजनेत 60 वर्षांपेक्षा अधिक वयाचे नागरिक गुंतवणूक करू शकतात.

मागील महिन्यात यातील गुंतवणूक रक्कम सरकारने दुप्पट केली आहे. सरकारद्वारे गुंतवणूक रक्कम 15 लाख रुपये करण्यात आली आहे. आधी ही रक्कम 7.5 लाख रुपये होती. नागरिकांना दर महिन्याला 10000 रुपये पेंशन मिळेल.

मार्चपर्यंत एकूण 2.23 लाख वरिष्ठ नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. तर याच्या आधी वरिष्ठ पेंशन विमा योजना 2014 अंतर्गत 3.11 लाख वरिष्ठ नागरिकांनी लाभ घेतला होता.

आधी ही योजना 4 मे 2017 ते 3 मे 2018 पर्यंतच होती. आता गुंतवणूक करण्याचा कालावधी 31 मार्च 2020 पर्यंत वाढवण्यात आला आहे.

Leave a Comment