एलॉन मस्क यांनी सायबर ट्रकद्वारे दिली थेट दिशादर्शकाला धडक

(Source)

टेक उद्योगपती एलॉन मस्क काही दिवसांपुर्वीच आपल्या इलेक्ट्रिक सायबर ट्रक लाँच केल्यानंतर चर्चेत आले होते. सध्या हा सायबर ट्रक चर्चेचा विषय ठरत आहे. शनिवारी रात्री स्वतः एलॉन मस्क यांना कॅलिफोर्नियाच्या रस्त्यावर हा सायबर ट्रक चालवताना पाहण्यात आले. मात्र या दरम्यान सायबर ट्रकने ट्रॅफिकसाठी लावलेल्या एका दिशादर्शकाला (traffic pylon) धडक दिल्याने, सोशल मीडिया युजर्स खिल्ली उडवत आहेत.

लॉस एंजिल्समधील सर्वात महागडे जापनीझ् रेस्टोरेंट असलेल्या नोबू येथे मस्क सायबर ट्रकमधून आले होते. यावेळी मस्क यांच्यासोबत अभिनेता एडवर्ड नॉर्टोन देखील होता.

हा ट्रक बुलेटप्रुफ असल्याचा कंपनीने दावा केला आहे. मात्र या ट्रकमध्ये सुरक्षेसाठी असलेले बेसिक फीचर जसे की, साईड मिरर आणि विंडो वायपर्स नाहीत. त्यामुळे या गाडीच्या सुरक्षेवर आणि मस्क यांच्या ड्राईव्ह क्षमतेवर नेटकरी प्रश्न उपस्थित करत आहे.

कारण बाहेर पडत असताना ट्रॅफिक दिशादर्शकला गाडीची धडक बसते. धडक बसताच मोठा आवाज होतो. मात्र या आवाजामुळे मस्क गाडी थांबवत नाहीत किंवा त्यांना त्याचा फरक पडताना दिसत नाही.

विशेष म्हणजे ज्या दिशादर्शकला धडक देण्यात आली आहे, त्यावर उजव्या साईडला वळण्याची सुचना देण्यात आलेली होती. मात्र मस्क  त्याकडे दुर्लक्ष करत थेट डाव्या बाजूला निघून जातात.

Leave a Comment