संसदेत ओवेसींनी फाडली नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाची प्रत


नवी दिल्ली – एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसींनी नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावरील चर्चेदरम्यान विधेयकाची प्रत फाडल्यानंतर सभागृहात मोठा गदारोळ झाला. त्यामुळे ओवेसींना लोकसभेच्या हंगामी अध्यक्षा रमा देवी यांनी सभागृहाबाहेर जाण्याचे आदेश दिले.

जिन्नांची विचारसरणी नाकारुन मौलाना आझादांच्या तत्त्वांचा पुरस्कार करुन वाटचाल केली. आझाद आपले आणि हिंदुस्तानचे 1 हजार वर्षांपासूनचे संबंध असल्याचे म्हणाले होते. मग मुस्लिमांची एवढी अडचण आताच्या सरकारला का होते? असा सवाल ओवेसींनी उपस्थित केला. देशाच्या विभाजनाचा प्रयत्न नागरिकत्व सुधारणा विधेयकाच्या माध्यमातून होत असल्याचा आरोप त्यांनी केला. सरकारने आणलेले विधेयक घटनेच्या गाभ्याविरोधात असून आमच्या स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान करणारे हे विधेयक आहे. देशाची फाळणी करणारे हे विधेयक मी फाडून टाकतो, असे ओवेसी म्हणाले.

Leave a Comment