नासाच्या रोवरने शोधली मंगळावरील एलियनच्या घरांची दारे?


जगभरात कित्येक वर्षे विविध ठिकाणी उडत्या तबकड्या पाहिल्याचे दावे केले जात आहेत मात्र त्यात एलियन किंवा परग्रहवासी होते का आणि असतील तर ते कसे होते याचे पुरावे अद्यापि कुणालाच देता आलेले नाहीत. परग्रहवासींच्या अस्तित्वाबद्दल वैज्ञानिक अनेक वर्षे पुरावे गोळा करत आहेत. आता हे प्रयत्न सार्थकी लागतील असे संकेत मिळाले आहेत. नासाच्या क्युरीऑसिटी रोव्हरने मंगळ ग्रहाचा एक असा फोटो मिळविला आहे, ज्यात फोटोत दिसत असलेला भाग एलियनच्या राहत्या गुहेचे दार असावे असा तर्क युएफओ तज्ञ व्यक्त करत आहेत.

या संदर्भातील एक तज्ञ स्कॉट वॉरिंग यांनी त्यांच्या ब्लॉगवर इटी डेटा बेस माध्यमातून हा फोटो प्रसिद्ध केला आहे. तिच्या मते नासाच्या क्युरीऑसिटी रोव्हरने टिपलेला हा फोटो जमिनीखाली राहत असलेल्या एलियन्सच्या गुहेचे दार असावे. हे फोटो स्कॉटला गीगापान ब्राउज करताना मिळाल्याचे तिचे म्हणणे आहे. ही वेबसाईट नासा, कार्नेगी विश्वविद्यापीठ आणि गुगल याच्यामध्ये एक सहयोगी प्रयत्न माध्यम म्हणून काम करते.

नासाच्या रोवरने टिपलेल्या फोटोत त्याच्यापासून जवळच काही अंतरावर एका दरवाजाचा आकार दिसत आहे. मंगळावरील हवामानामुळे एलियन जमिनीखाली वास्तव्य करत असावेत असा अंदाज पूर्वीच वर्तविला गेला होता. रोव्हर जवळ एक मशीनचा भाग असावा अशी वस्तू सुद्धा दिसते आहे. त्याचा वापर एलियन्स यांत्रिक हात म्हणून करत असावेत असाही तर्क लढविला जात आहे. एकंदरीत एलियन्स हे बुद्धिमान प्राणी असावेत असेही म्हटले जाते.