ट्विंकल खन्नालाही कांदा महागाईची झळ


कांद्याच्या वाढते दर सर्वसामान्य माणसालाच रडवत नाहीत तर श्रीमंत आणि सेलेब्रिटीना सुद्धा कांद्याचे वाढते दर विचार करायला लावत आहेत. बॉलीवूड स्टार अक्षयकुमार याची पत्नी, अभिनेत्री आणि लेखिका ट्विंकल खन्ना हिने एक ब्लॉग शेअर करून कांदा दरवाढी बद्दल सरकारवर टीका केली आहे. देशात सध्या कांदा ८० ते २०० रुपये किलोने विकला जात आहे.

ट्विंकलने एका वेबसाईटवर हा ब्लॉग शेअर केला आहे. आणि कांद्याची तुलना महागड्या अवाकाडो या फळाशी केली आहे. ती म्हणते मी कॉमर्स शाखेत शिक्षण घेतले पण गेली वीस वर्षे घर विज्ञान हेच माझे क्षेत्र राहिले आहे. कोणत्याही दक्ष गृहिणी प्रमाणे मीही खर्च कमी कुठे करता येईल हे पाहते आणि त्यासाठी माझे गृह सायन्स स्कील वापरते. कांद्याचे गगनाला भिडलेले दर पाहून ट्विंकलने विना कांद्याच्या पाच रेसिपी कश्या बनवायच्या याची माहिती दिली आहे. ती म्हणते या साठी मी माझ्या जैन दोस्तांची मदत घेतली तसेच गुगलचीही मदत घेतली.

ट्विंकलने कांदा न वापरता पावभाजी, चिकन करी, राजमा, वांगे भरीत, मटनखिमा कसा बनवयाचा याच्या रेसिपी शेअर केल्या आहेत.

Leave a Comment