दक्षिण आफ्रिकेच्या सौंदर्यवतीने पटकवला युनिव्हर्स खिताब


दक्षिण अफ्रिकेच्या सौंदर्यवतीने यंदाचा मिस युनिव्हर्स 2019 चा मान पटकावला आहे. रविवारी 68व्या मिस युनिव्हर्स स्पर्धेचे अमेरिकेतील अटलांटा येथे आयोजन करण्यात आले होते. जगभरातील एकूण 90 सौंदर्यवती या महासोहळ्यात सहभागी झाल्या होत्या. दक्षिण अफ्रिकेच्या जोजिबिनी तुंजीने या सगळ्या सौंदर्यवतींना मागे टाकत मिस युनिव्हर्स 2019 होण्याचा बहुमान पटकावला आहे. जेव्हा विश्वसुंदरीचा मुकूट सौंदर्यवती जोजिबिनीने परिधान केला तेव्हा ती अति भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.

शेवटच्या राऊंडसाठी गोल्डन रंगाचा सुंदर ड्रेस मिस युनिव्हर्स जोजिबिनीने परिधान केला होता. तिचे नाव जेव्हा मिस युनिव्हर्स म्हणून घोषित करण्यात आले त्यावेळी जोजिबिनीला अश्रू अनावर झाले. सगळ्या प्रश्नांची तिने हजरजबाबीपणाने खूप चांगली उत्तर दिल्याचे परीक्षकांनी सांगितले. परीक्षक जोजिबिनीच्या उत्तरांवर खूप खूश असल्याचे पाहायला मिळाले.
https://www.sapeople.com/wp-content/uploads/2019/12/Miss-South-Africa-crowned-900×600.jpg
मिस मॅक्सिको आणि जोजिबिनी यांच्यात चुरशीची स्पर्धा झाली. सौंदर्यवती मॅक्सिकोला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. यामध्ये दक्षिण अफ्रिका, मॅक्सिको, कोलंबिया, थायलंड, प्‍यूरटोरिको या देशांमधील सौंदर्यवती पहिल्या 5 मध्ये होत्या. तर भारताच्या वर्तिका सिंहने पहिल्या दहामध्ये येण्याचा मान पटकावला होता. 2018 रोजी मिस युनिवर्सचा किताब पटकवलेल्य़ा कॅटोरिना ग्रेने जोजिबिनी तुंजीला मुकूट परिधान केला.

missuniverse.comवरून मिळालेल्या माहितीनुसार विश्वसुंदरी जोजिबिनी ही दक्षिण अफ्रिकेतील टोस्‍लो येथील रहिवासी आहे. वेगवेगळ्या क्षेत्राशी निगडीत समाजसेवेसाठी तिने उल्लेखनीय काम केले आहे. समाजसुधारणेच्या हेतूने मीडिया कॅम्पेनिंग राबवले आहेत. तिथे जाचक रुढी आणि प्रथांविरोधातही सोशल मीडिया आणि वेगवेगळ्या माध्यमातून आवाज उठवला आहे. जोजिबिनी तुंजीचे स्वत:वर खूप प्रेम आहे. स्वत:वर भरभरून प्रेम करायला हवे असा संदेशही ती इतर महिलांना देते. जोजिबिनी आपल्या तीन बहिणींसोबत टोस्लो येथे राहाते. या स्पर्धेत भाग घेण्याआधी ती केपटाउन येथे पब्लिक रिलेशंस डिपार्टमेंटमध्ये इंटरनशिप करत होती. माझे वडिल माझा आदर्श असल्याचेही तिने यावेळी सांगितले.

भारताकडून या स्पर्धेत वर्तिका सिंहने सहभाग घेतला होता. वर्तिका पहिल्या 10 मध्ये येऊ न शकल्यामुळे चाहत्यांमध्ये नाराजी आहे. या आधी भारताकडून सुष्मिता सेन, लारा दत्ता, मानुषी छिल्लर यांनी विश्व सुंदरीचा किताब पटकावला आहे. वर्तिका सिंह ही लखनऊची रहिवासी असून मिस युनिवर्सच्या स्पर्धेत सहभागी झाल्यानंतर तिच्या सौंदर्याची आणि तिची तुफान चर्चा झाली होती. पहिल्या 10मध्ये येण्याचा मान मात्र वर्तिकाला मिळवू शकली नाही. त्यामुळे वर्तिकाच्या चाहत्यांमध्ये थोडी नाराजी आहे.

Leave a Comment