फेक लाईक्स आणि फॉलोवर्सला वैतागल्या सोशल मीडिया कंपन्या

मोठ्या टेक्नोलॉजी कंपन्यांद्वारे सोशल मीडियावर खोटे लाईक्स आणि फॉलोवर्स रोखण्यांसाठी करण्यात आलेले प्रयत्न अयशस्वी ठरले आहेत. नाटो स्ट्रेटेजिक कम्यूनिकेशन एक्सिलेंस सेंटरच्या संशोधकांच्या एका रिपोर्टनुसार, फेसबुक आणि ट्विटरसारख्या कंपन्या या फेक लाईक्स आणि फॉलोवर्ससमोर असाह्य आहेत. कोणीही व्यक्ती, पैसे देऊन अधिक लाईक्स, कॉमेंट आणि क्लिकसाठी कोणत्याही कंपनीची सेवा घेतात.

नाटोला सल्ला देणाऱ्या स्वयंसेवी सेंटरने टेक कंपन्याच्या 11 रशिया आणि 5 युरोपियन कंपन्यांद्वारे पैसे देऊन चालवण्यात येणाऱ्या अभियानला रोखण्याच्या क्षमतेचे परिक्षण केले. संशोधकांनी, 23 हजार रुपयात 3500 कॉमेंट्स, 25 हजार लाईक्स, 20 हजार व्ह्यूज आणि 5 हजार फॉलोवर्स खरेदी केले. यामध्ये युरोपच्या सर्वोच्च एंटी ट्रस्ट अधिकारी मार्गरेट वेस्टागर सारख्या प्रमुख राजकीय नेत्यांच्या पोस्टवर आलेल्या लाईकचा समावेश आहे. 4 आठवड्यानंतर देखील फेक क्लिक तसेच होते. टेक कंपन्यांना याची माहिती दिल्यानंतर देखील तीन आठवडे क्लिक जनरेट करणारे अकाउंट सुरू होते.

रशियाद्वारे 2016 च्या अमेरिकेतील राष्ट्रपती निवडणुकीत दखल दिल्यानंतर कंपन्यांनी खोट्या बातम्या प्रसारण रोखण्यापासून अनेक नियम बदलले. काही दिवसांपुर्वीच चीन, सौदी अरेबिया आणि आफ्रिकेतील काही अकाउंट देखील बंद करण्यात आले. रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, संशोधकांनी सोशल मीडियावर बनावट काम करणारे जवळपास 20 हजार अकाउंट खरेदी केले. त्यांची ओळख पटवली. त्यांचे सँपल इंटरनेट कंपन्यांना पाठवले. तरी देखील 3 आठवड्यांनी 95 टक्के अकाउंट ऑनलाईन सुरूच होते.

संशोधकांच्या समोर आले की, मोठ्या टेक कंपन्या या फेक एक्टिव्हिटी रोखण्यास असक्षम ठरल्या आहेत. दुसऱ्या नेटवर्कच्या तुलनेत ट्विटरने सर्वाधिक अकाउंट हटवले आहेत. ट्विटरने खरेदी केलेले अधिक लाईक्स आणि रिट्विट देखील हटवले. अविश्वसनीय कंटेट हटवण्यामध्ये यूट्यूब सर्वाधिक असक्षम ठरले आहे. फेसबुकने खोटे अकाउंट हटवणे आणि ब्लॉक केले, मात्र खोटा कंटेट हटवण्यास असक्षम ठरले आहे. इंस्टाग्रामवर फेक लाईक्स आणि कमेंट्स मिळवणे सर्वाधिक सोपे आहे.

हा खोटा व्यवसाय करणाऱ्यांमध्ये शेकडो लोकांचा समावेश आहे. रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, फसवणुक करणारे प्रोवाईडर मेजर प्लॅटफॉर्मवर उघडपणे जाहिराती करतात. फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि युट्यूबवर शेकडो पोस्टवर याचा परिणाम झाला आहे. मात्र यावर कोणतीही कारवाई झालेली नाही.

 

Leave a Comment