रणजी ट्रॉफीच्या चालू सामन्यात चक्क सापाने घेतली मैदानावर एंट्री

रणजी ट्रॉफीमध्ये आंध्रप्रदेश आणि विदर्भ संघामध्ये सुरू असलेल्या सामन्यात एक विचित्र छटना पाहायला मिळाली. आंध्र प्रदेशमधील मुलापाडू येथे चालू सामन्यात चक्क सापाने मैदानात एंट्री घेतली. साप मैदानात आला त्यावेळी खेळ सुरू झाला नव्हता. केवळ खेळाडू फिल्डिंग पोजिशनवर पोहचले होते. सापामुळे काहीवेळ सामना थांबवण्यात आला होता.

या घटनेचा व्हिडीओ बीसीसीआयने ट्विटरवर शेअर केला आहे. बीसीसीआयने व्हिडीओ शेअर करत लिहिले की, सापाने खेळ थांबवला. मैदानावर एक पाहुणा आला होता, ज्यामुळे सामना सुरू होण्यास उशीर झाला.

आजपासून सुरू झालेल्या या सामन्यात विदर्भाचा कर्णधार फैज फजलने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.

Leave a Comment