या बनल्या जगातील सर्वात तरूण पंतप्रधान

फिनलँडच्या सोशल डेमोक्रेट पक्षाने रविवारी पंतप्रधानपदी 34 वर्षीय माजी परिवहनमंत्री सना मरीन यांची निवड केली. याचबरोबर त्या देशाच्या इतिहासातील सर्वात तरूण पंतप्रधान देखील ठरल्या. रविवारी झालेल्या मतदानात मरीन यांनी विजय मिळवत एंटी रिने यांचे स्थान घेतले. रिने यांना टपाल संपमुळे सत्तेत सहयोगी पक्ष असलेल्या सेंटर पक्षाचा विश्वास गमवावा लागला होता.

विजयानंतर मरिन म्हणाल्या की, पुन्हा विश्वास जिंकण्यासाठी आम्हाला खूप कामे करायची आहेत. मी माझ्या जेंडर अथवा वयाबद्दल कधीच विचार केला नाही. ज्या कारणांमुळे मी राजकारणात आले. कदाचित त्याच कारणांमुळे आम्ही मतदारांचा विश्वास जिंकू शकलो.

34 वर्षीय मरीन या जगातील सर्वात तरूण पंतप्रधान आहेत. युक्रेनचे पंतप्रधान ओलेस्की होनचार्क हे 35 वर्षीय आहेत. 700 टपाल कर्मचाऱ्यांचे वेतन कमी करण्याच्या कारणावरून करण्यात आलेल्या संपानंतर पंतप्रधान रिने यांनी राजीनामा दिला होता.

Leave a Comment