समुद्रातील ऑक्सिजनच्या मात्रेत 2 टक्क्यांनी घट

हवामान बदलामुळे समुद्रातील ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे महासागरातील जीव, मच्छिमार आणि तटावर राहणाऱ्या लोकांना धोका निर्माण झाला आहे. आंतरराष्ट्रीय निसर्ग संरक्षण संघाने (आययूसीएन) म्हटले आहे की, जगभरात अशी 700 ठिकाणं आहेत जेथे ऑक्सिजनची मात्रा कमी झाली आहे. 1960 मध्ये ही संख्या केवळ 45 होतील. याशिवाय ऑक्सिजनचे प्रमाण अगदी शून्य आहे, अशा ठिकाणांची संख्या चारपट वाढली आहे. समुद्रीय जीव गरम तापमान, मासेमारी आणि प्लास्टिक प्रदुषणाचा सामना करत आहेत.

आययूसीएननुसार, समुद्र जीवाश्म इंधनाद्वारे निर्माण होणारा कार्बन उत्सर्जन शोषून घेतात. समुद्रातील ऑक्सिजन कमी होण्याचे असेच प्रमाण राहिले तर 2100 मध्ये जागतिक स्तरावर समुद्रातील ऑक्सिजनची मात्रा 3 ते 4 टक्के कमी होईल. सध्या ऑक्सिजनचे प्रमाण 2 टक्के कमी झाले.

ऑक्सिजनची कमतरता समुद्र सपाटीपासून 1 हजार मीटर खोलपर्यंत जाईल. याच ठिकाणी समुद्र जैव विविधतेचा सर्वात संपन्न भाग आहे. आययूसीएनचे कार्यवाहक संचालक ग्रेथल एग्यूइलर म्हणाले की, समुद्री जीवांच्या संतुलनामध्ये अव्यवस्था निर्माण झाली आहे आणि ज्या जीवांना अधिक ऑक्सिजनची गरज असते त्यांना धोका निर्माण झाला आहे. टूना, मर्लिन आणि शार्क सारख्या प्रजाती आधीच धोक्यात आहेत.

Leave a Comment