मागील 5 वर्षात तब्बल 7 हजार आयआयटी विद्यार्थी झाले ड्रॉप आउट

मागील 5 वर्षात आयआयटीमध्ये प्रवेश घेतलेल्या जवळपास 7248 विद्यार्थ्यांनी मधूनच शिक्षण सोडले आहे. लोकसभेत ही आकडेवारी देण्यात आली. विद्यार्थ्यांनी एग्जिट ऑप्शनमध्ये सूट देण्यात यावी, याविषयी बोलताना मानव संसाधन विकास मंत्रालयाने ही आकडेवारी दिली.

एग्जिट ऑप्शन म्हणजेच विद्यार्थ्यांना दुसऱ्या सेमेस्टरनंतर कोर्स बदलून बीटेकमधून बीएससीला प्रवेश घेण्यास परवानगी देणे. अनेक विद्यार्थी खास कोर्सचा तणाव सहन करू शकत नाहीत. त्यामुळे त्यांना कोर्स बदलण्याची परवानगी देण्यात येते. एग्जिट ऑप्शनच्या स्विकार्यतेबद्दल आयआयटीज तयार आहेत, मात्र काही आयआयआयटीज हा पर्याय योग्य नसल्याचे सांगतात.

सध्या आयआयआयटीजचा कोर्स मधेच सोडणाऱ्या विद्यार्थ्यांचा डेटा उपलब्ध नाही. काही महिन्यांपुर्वीच आयआयटी काउंसिलने एग्जिट ऑप्शन निवडण्याचा निर्णय सर्व आयआयटीजवर सोडला होता. यानंतर हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला असून, या प्रस्तावात आयआयआयटीजच्या बोर्ड ऑफ गर्व्हनर यांना हा पर्याय निवडण्याचा अधिकार देण्यात आला आहे.

अनेक आयआयचीजचे म्हणणे आहे की, देशातील प्रमुख इंजिनिअरिंग संस्थेमधील वाढत्या ड्रॉप आउट रेटसाठी पर्याय एग्जिट ऑप्शन नाही.

आयआयआयटी पुण्याच्या रजिस्ट्रार एस. एन. सपाली यावर म्हणाल्या की, आम्ही आमच्या विद्यार्थ्यांकडे लक्ष देतो व त्यांना मार्गदर्शन करतो. आमच्या येथे विद्यार्थ्यांसाठी एग्जिट प्रोग्रामचा काहीही पर्याय नाही.

अनेक पोस्ट ग्रेज्यूएशनचे विद्यार्थी चांगली नोकरीची ऑफ आल्याने देखील मधेच कोर्सच सोडतात.

Leave a Comment