या म्यूझियमच्या तळघरात आहे एक विचित्र खजिना

म्यूझियम ऑफ लंडनच्या तळघरात एक विचित्र खजिना ठेवण्यात आलेला आहे. येथे येणाऱ्याला कदाचितच या खजिन्याबद्दल माहिती असेल. म्यूझियममध्ये फिरताना तुम्हाला अनेक प्राचीन गोष्टींचा अनुभव येईल, मात्र तळघरात गेल्यावर तुम्ही आश्चर्यचकित व्हाल.

(Source)

या तळघरात व्यवस्थित ठेवलेले हजारो पुठ्ठ्याचे बॉक्स आहेत. या बॉक्सवरील लेबल वाचल्यावर तुमचा विश्वास बसणार नाही. कारण, यावर लिहिण्यात आलेले आहे मानवी सापळे.

लंडन आणि आजुबाजूच्या परिसरात खोदकाम करताना हे सापळे सापडलेले आहेत. यातील अनेक एक शतक जुने आहेत, तर काही हजारो वर्ष जुने आहेत. लंडनच्या म्युझियममधील हे सापळे मानवीय अवशेष अवशेषांचा एक मोठा खजिना आहे.

(Source)

या सापळ्यांची काळजी घेणाऱ्या येलेना बेक्वालाक सांगतात की, इंग्लंडच्या रोमन काळापासून ते 19व्या शतकापर्यंतची कथा हे सापळे सांगतात. या सापळ्यांची तपासणी केल्यानंतर अनेक इतिहासकारांनी लंडनच्या इतिहासात अनेक फेरबदल केले. जसे की, लंडनमध्ये प्लेगमुळे झालेल्या मृत्यूंना पुन्हा एकदा सापळ्यांद्वारे समजण्यात आले. सांगण्यात येते की, प्लेगवेळी लंडन शहर संपुर्ण संपुष्टातच आले होते. मात्र सापळे बघितल्यावर समजते की, प्लेगद्वारे मृत्यू झालेली थडगी अगदी व्यवस्थित रित्या खोदण्यात आली होती.

(Source)

असे म्हटले जाते की, मध्य युगात मनुष्य दातांच्या सफाईविषयी पर्वा करत नसे. दातांच्या सफाईला या काळात अधिक महत्त्व आले. मात्र लंडनचे हे अवशेष सांगतात की, मध्य युगात देखील मनुष्याचे दात अधिक साफ होते. याशिवाय लंडनमधील औद्योगिक क्रांतीचा परिणाम लोकांच्या आरोग्यावर कसा झाला, हे देखील या अवशेषांद्वारे समजते.

मागील अनेक दशकांमध्ये लाखो लोक लंडनमध्ये दफन करण्यात आले आहे. यातील अनेक सापळे विकास कामे करताना सापडले आहेत. तज्ञ सांगतात की, आधी चर्चच दफनभूमीची काळजी घेत असे. अनेकदा चर्चंना शाळेचा विस्तार करायचा असे तेव्हा ते दफनभूमीच विकत असे. 2011 मध्ये चर्च ऑफ इंग्लंडच्या प्रायमेरी शाळेतील मैदानाचे खोदकाम करताना 959 सापळे सापडले होते.

(source)

सापडलेले अनेक सापळे म्यूझियम ऑफ लंडनकडे सोपवले जातात. अनेकदा केस अथवा नखे सापडतात. आता सापळ्यांची दोन गटात विभागणी करून त्यांची तपासणी केली जातील. यात 1500 सापळे लंडनचे आहेत तर 1000 सापळे लंडनच्या बाहेरील आहेत. याच प्रकारे काही औद्योगिक क्रांतीच्या आधीचे आहेत तर काही नंतरचे आहेत. यामध्ये तुलना करून दोन्ही काळातील फरक समजण्याचा प्रयत्न केला जात आहे.

(Source)

सापळ्यांची तपासणी करताना आधुनिक तंत्रज्ञान फायदेशीर ठरते. याद्वारे  त्या काळातील व्यक्तींच्या आरोग्याबद्दल माहिती मिळते. जसे की, औद्योगिक क्रांतीनंतर इंग्लंडमधील लोकांच्या राहणीमानात मोठे बदल झाले. मात्र त्याचबरोबर त्यांना लठ्ठपणा आणि मधुमेहाचा सामना करावा लागला.

(Source)

या सापळ्यांवर एखाद्या धातूचा विशेष प्रभाव दिसून येतो. जसे की, एका टाकसाळाजवळ दफनभूमीतील सापळ्यांजवळ हिरवे निशाण सापडले. जे सांगतात की, येथे अनेक टाकसाळ होते. येथील केमिकलने सापळ्यांवर मोठा परिणाम झाला. लंडन ऑफ म्यूझियमच्या या खास खजिन्यामुळे इंग्लंडचा इतिहास आणखी नव्या अर्थाने समोर येईल, अशी शक्यता आहे.

Leave a Comment