‘ला लिगा’त हॅट्रिक गोल करणारा हा ठरला सर्वात वयस्कर खेळाडू

स्पेनच्या ला लिगा फुटबॉल लीगमध्ये रविवारी रियाल बोटिसचा कर्णधार जोओकिन सांचेचने एथलेटिक बिलबाओविरुद्धच्या सामन्यात हॅट्रिक गोल केले. त्याच्या शानदार कामगिरीमुळे बेटिसने बिलबाओ संगाचा 3-2 असा पराभव केला.

जोआकिन टुर्नामेंटच्या इतिहासात हॅट्रिक गोल करणारा सर्वात वयस्कर फुटबॉलर ठरला आहे. त्याचे वय 38 वर्ष 140 दिवस आहे. ही त्याच्या करिअरमधली पहिली हॅट्रिक आहे. जोआकिनने रियल मॅद्रिदच्या एलफ्रेडी डी  स्टेफानोचा 55 वर्ष जुना विक्रम मोडला.

जोआकिनने सामन्याच्या दुसऱ्या, 11व्या आणि 20 व्या मिनिटाला गोल केला. 20 मिनिटांच्या आत हॅट्रिक गोल करणारा तो सातवा खेळाडू आहे.

जोआकिनने स्पेनकडून 51 सामने खेळले आहेत. त्याने वर्ष 2000 मध्ये बेटिससोबत प्रोफेशनल करिअरची सुरूवात केली होती. त्यानंतर 2006 ते 2011 वेलेंसिया, 2011 ते 2015 मलागा आणि 2013 ते 2015 पर्यंत फिओरेटिंनासाठी खेळला. 2015 मध्ये पुन्हा त्याने बेटिससोबत करार केला. त्याने ला लिगाच्या 533 सामन्यात 72 गोल केले आहेत.

Leave a Comment