हैदराबाद एनकाऊंटरमधील आरोपींच्या मृतदेहांवर करु नका शुक्रवारपर्यंत अंत्यसंस्कार


हैदराबाद : तेलंगणा उच्च न्यायालयात देशभर गाजत असलेल्या हैदराबात एन्काउंटर प्रकरणावर सुनावणी सुरू आहे. उच्च न्यायालयाने या प्रकरणी आदेश देत आरोपींच्या मृतदेहांवर शुक्रवारपर्यंत अंत्यसंस्कार करू नका, ते मृतदेह जतन करून ठेवण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. त्याचबरोबर आता येत्या गुरुवारी या प्रकरणाची पुढची सुनावणी होणार आहे.

हैदराबाद एनकाऊंटर प्रकरणी काही सामाजिक संघटनांनी तेलंगणा उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. सर्व आरोपींचे पोलिसांनी एन्काउंटर केल्यानंतर देशभर प्रचंड वादळ निर्माण झाले होते. पोलिसांचे सामान्य लोकांनी कौतुक केले तर अनेक नेते आणि संघटनांनी संशय व्यक्त केला. प्रकरण न्यायालयात गेल्याने पोलिसांना आता सर्व शंकांचे उत्तर न्यायालयात द्यावे लागणार आहे.

26 वर्षांच्या पशुवैद्यकीय डॉक्टरवर हैदराबादच्या हद्दीत शमशाबाद येथे बलात्कार आणि खून करण्यात सामील असलेल्या चारही आरोपींना शुक्रवारी सकाळी सायबराबाद पोलिसांनी एका चकमकीत ठार केले. पोलिसांच्या अहवालानुसार, मोहम्मद अली उर्फ मोहम्मद आरिफ, जोल्लू शिवा, जोल्लू नवीन कुमार, आणि चिंताकुंता चेन्ना केशवुलू या चार आरोपींनी पोलिसांवर हल्ला केला आणि पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांना गोळीबार करून चौघांनी ठार मारले.

Leave a Comment