ज्या जागेवर कोणत्याही देशाचा अधिकार नव्हता, तेथे एक भारतीय बनला होता ‘राजा’

पृथ्वीवर अशा अनेक जागा आहेत, ज्या ‘नो मॅन्स लँड’ श्रेणीत येतात. आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार, ‘नो मॅन्स लँड’ दोन देशातील सीमांमधील तो खाली हिस्सा असतो, ज्याच्यावर कोणत्याही देशाचे कायदेशीर नियंत्रण नसते. मात्र या जागेवर कोणीही कायदेशीर दावा करू शकते. आफ्रिकेत देखील अशीच एक जागा आहे, ज्याच्यावर कोणत्याच देशाचा अधिकार नाही.

(Source)

या जागेचे नाव बीर ताविल असे आहे. 2060 वर्गमीटरमध्ये पसरलेला हा भाग इजिप्त आणि सूडान सीमेच्या मध्यभागी आहे. इजिप्त आणि सूडानने 20 व्या शतकात आपल्या सीमा या प्रकारे बनवल्या की, या भागावर कोणाचाच अधिकार नव्हता.

(Source)

बीर ताविल एक वाळवंट आहे. येथे कोणतेही पीक उगवणे शक्यच नाही. याच कारणामुळे या जागेवर कोणीच दावा करत नाही. मात्र असे असले तरी या जागेने अनेकांना आकर्षित केले आहे.

(Source)

2014 मध्ये अमेरिकेच्या व्हर्जिनिया येथील एका शेतकऱ्यांने बीर ताविलमध्ये एक झेंडा लावून स्वतःला ‘उत्तर सुडानच्या राज्याचा गव्हर्नर’ घोषित केले होते. त्यांना त्यांच्या मुलीला राजकुमारी बनवायचे होते. त्यानंतर 2017 साली एका भारतीयाने या जागेला स्वतःचा देश घोषित करत ‘किंगडम ऑफ दिक्षित’ असे नाव दिले.

(Source)

मध्य प्रदेशच्या इंदौर येथे राहणाऱ्या सुयश दिक्षितने या ठिकाणी स्वतःला राजा घोषित केले होते व वडिलांना पंतप्रधान केले होते. त्याने स्वतःचा ध्वज देखील तयार करत तेथील जमिनीत गाडला होता.

(source)

याशिवाय या वाळवंटात पाल सोडून एकही प्राणी नसल्याने त्याने या देशाचा राष्ट्रीय प्राणी म्हणून पालीची निवड केली.

(source)

सुयशला फिरण्याची आवड आहे. त्याने बीर ताविल येथे जाऊन झाड लावण्यासाठी बियाणे देखील टाकली होती आणि त्यांना पाणी देखील टाकले होते.

Leave a Comment