सौंदर्यासाठी सब्जाचे फायदे


उन्हाळा सुरू झाला की लिंबू सरबतापासून आईसक्रीम पर्यंत सगळ्यावर सब्जाच्या लहान लहान बिया घातलेल्या दिसयला लागतात. शरीरातील उष्णता संतुलित ठेवण्याकरिता सब्जा अतिशय उपयोगी आहे. त्याशिवाय आपल्या चेहऱ्याचे सौंदर्य वाढविण्यास ही सब्जाचा उपयोग होतो. सब्जामध्ये असणारे अँटी ऑक्सिडंट्स त्वचेचा पोत सुधारून त्वचा नितळ बनविण्यास मदत करतात. त्याचबरोबर सब्जामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असल्याने शरीराचे पचनकार्य ही सुरळीत राहण्यास मदत होते. सब्जाच्या सेवनाने शरीरातील हानिकारक द्रव्ये बाहेर टाकली जाऊन शरीर निरोगी बनते.

सब्जाचे सेवन सर्वसाधारणपणे कुठल्याही द्रव पदार्थाबरोबर केले जाते. सब्जामुळे आपल्या शरीरामधील उष्णता कमी होऊन, त्यामुळे उद्भाविणारे उष्णतेचे विकार कमी होण्यास मदत होते. उष्णतेमुळे तोंड येणे, मुरुमे , पुटकुळ्या येणे, हातापायांची जळजळ, त्वचेवर लालसर चट्टे उठणे इत्यादी विकार सब्जाच्या सेवनाने दूर होऊ शकतात. तसेच त्वचेची अनेक प्रकारची इन्फेक्शन, उदाहरणार्थ एक्झिमा, सोरायसिस या व्याधींवरही सब्जा गुणकारी आहे. त्वचेचे विकार असणाऱ्यांनी सुक्या सब्जाच्या बिया बारीक कुटून घेऊन खोबरेल तेलात मिसळाव्यात. हे मिश्रण अगदी थोडेसे गरम करून लावल्यास एक्झिमा सारख्या व्याधींमध्ये गुण येण्यास मदत होते.

सब्जाच्या बियांमध्ये लोह, जीवनसत्वे आणि प्रथिने मुबलक मात्रेमध्ये असल्याने केसांच्या आरोग्याकरिता सब्जा उत्तम आहे. सब्जाच्या सेवनाने केस लांब, दाट आणि चमकदार बनतात.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment