उच्च न्यायालयाने कायम ठेवली ‘डॅडीं’ची जन्मठेप


मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसांडेकर हत्याप्रकरणी मोठा निकाल दिला आहे. यात कुख्यात गँगस्टर अरुण गवळीची जन्मठेप कायम ठेवण्यात आली आहे. एकूण 11 आरोपी या खून खटल्यात आहेत. अरुण गवळी आणि इतर आरोपींना या खटल्यात मुंबई सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्याविरोधात सर्व दोषींनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.

या याचिकांवर तीन महिन्यापूर्वी सुनावणी पूर्ण झाली होती. या प्रकरणात आज न्यायालयाने इन चेंबर निकाल सांगितला. यावेळी अरुण गवळीची जन्मठेप न्यायालयाने कायम ठेवत असल्याचे म्हटले आहे. मोक्का कायदा या खटल्यात लावण्यात आला होता. काहींवरील मोक्का न्यायालयाने हटवला आहे.

सध्या नागपूर मध्यवर्ती कारागृहात डॉन अरुण गवळी जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या हत्येप्रकरणी अरुण गवळीला जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. अरुण गवळीने एकेकाळी मुंबईमध्ये आपली दहशत निर्माण केली होती. कुख्यात गुंड आणि अंडरवर्ल्ड डॉन म्हणून अरुण गवळीची गुन्हेगारी विश्वात ओळख आहे.

Leave a Comment