जेम्स बाँडच्या आगामी चित्रपटात दिसणार या शानदार कार्स

जेम्स बाँडचा आगामी चित्रपट ‘No Time To Die’ चा ट्रेलर रिलीज झाला आहे. हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे, मात्र चाहत्यांमध्ये आतापासूनच याची उत्सुकता दिसून येत आहे. या ट्रेलरमध्ये देखील जेम्स बाँड म्हणजेच डेनियल आपल्या नेहमीच्या एक्शन अंदाजात पुन्हा एकदा बाईक आणि कारद्वारे जबरदस्त स्टंट करत आहे. या चित्रपटामध्ये कोणत्या कार्स आणि बाईक पाहायला मिळतील त्याविषयी जाणून घेऊया.

(Source)

एस्टॉन मार्टिन डीबी5 –

एस्टॉन मार्टिनशिवाय बाँडपटाचा विचार देखील केला जावू शकत नाही. ट्रेलरमध्ये देखील ही कार सर्वात प्रथम दिसते. ट्रेलरमध्ये कार हेडलाईडद्वारे गोळ्या चालवत आहे. काही दिवसांपुर्वीच बाँडपट ‘थंडरबॉल’मध्ये दाखवण्यात आलेल्या एस्टॉन मार्टिन डीबी 5 चा 6.4 मिलियन डॉलरला लिलाव झाला.

(Source)

एस्टॉन मार्टिन व्ही8 वेंटेज –

या ट्रेलरमध्ये एस्टॉन मार्टिन व्ही8 वेंटेज देखील दिसत आहे. 1977 व्ही8 वेंटेज अनेकदा बाँडपटात दाखवण्यात आली आहे. या कारला सर्वात प्रथम 1978 मध्ये पहिल्यांदा ‘द लिव्हिंग डे’ चित्रपटात दाखवण्यात आली होती. यात टिमोथी डॉल्टन जेम्स बाँड होता.

(Source)

एस्टॉन मार्टिन डीबीएस Superleggera –

ट्रेलरमध्ये एस्टॉन मार्टिनची डीबीएस Superleggera देखील दिसत आहे. या कारमध्ये 5.2 लीटर ट्विन चार्ज्ड व्ही12 इंजिन आहे, जे 715 एचपी पॉवर आणि 900 एनएम टार्क देते. या कारचा टॉप स्पीड ताशी 340 किमी आहे. तर केवळ 3.4 सेंकदात कार 0 ते 100 किमीचा वेग पकडते.

(Source)

लँड रोव्हर आणि लँड क्रुझर –

ट्रेलरमध्ये लँड रोव्हर आणि लँड क्रुजर दिसत आहेत. ट्रेलरमध्ये स्कॉटलँडमध्ये कोणत्यातरी ठिकाणी लँड रोव्हर रेंझ रोव्हर स्पोर्ट एसव्हीआर आणि 90 च्या दशकातील लँड क्रुझर प्राडो पाठलाग करत आहेत व यातून टोयोटो सहज वाचते.

(Source)

लँड रोव्हर डिफेंडर –

या चित्रपटात लँढ रोव्हर डिफेंडर देखील दिसणार आहे. डिफेंडर पुढील वर्षी भारतात दाखल होणार आहे. या मध्ये पी300 2 लीटरचे 4 सिलेंडर इंजिन आहे. जे 296 बीएचपी पॉवर देते. याची किंमत 80 ते 97 लाखांमध्ये असेल.

(Source)

एस्टॉन मार्टिन Valhalla –

आगामी बाँटपटात ही सुपर कार पाहायला मिळणार आहे. ही कार एस्टॉन मार्टिन आणि रेड बुल रेसिंगने मिळून बनवले आहे. ही कार जिनिव्हा मोटर शोमध्ये सादर करण्यात आली होती.

Leave a Comment