रिलीज आधीच दबंग 3 ने कमावले 155 कोटी


रिलीज होण्यापूर्वीच दबंग सिरीजच्या तिसऱ्या चित्रपटाने १५५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. अॅमेझॉन प्राइमला ऑनलाइन स्ट्रीमिंग, टी सिरीजला संगीत आणि झी टीव्हीला सॅटेलाइट्सचे चित्रपटाने अधिकार विकले आहेत. सलमान खानच्या व्यतिरिक्त चित्रपटात सई मांजरेकर, किच्चा सुदीप, सोनाक्षी सिन्हा मुख्य भूमिकेत आहे. प्रभुदेवा दिग्दर्शित ‘दबंग 3’ 20 डिसेंबर रोजी रिलीज होणार आहे.

चित्रपटाने आपले डिजिटल अधिकार ओटीटी प्लेटफॉर्म अॅमेझॉन प्राइम व्हिडिओला ६० कोटी रुपयात विकले आहेत. दुसरीकडे ८० कोटी रुपयात झी नेटवर्कने सॅटेलाइट अधिकार विकत घेतले आहेत. याव्यतिरिक्त टी सिरीजने १५ कोटी रुपयांत चित्रपटाचे संगीत अधिकार विकत घेतले आहेत.

प्रभुदेवाने चित्रपटाविषयी सांगितले, सलमानचा हा चित्रपट आहे. त्याला डोक्यात ठेवून त्याचे पात्र तसे रचण्यात आले. लोकांना चित्रपटातील पात्र खूप आवडेल. हा चित्रपट दोन्ही सिरीजच्या तुलनेत मोठा आणि सर्वात चांगला ठरणार आहे. चित्रपटाची निर्मिती सलमान खान, अरबाज खान आणि निखिल द्विवेदी करत आहेत. संगीत साजिद वाजिद यांचे आहे. कथा स्वत: सलमानने लिहिली आहे.

Leave a Comment