बलात्कार किंवा हत्येचा आरोप सिद्ध झाल्यास नेत्यांची ताबडतोब हकालपट्टी करा


नवी दिल्ली – एन्काऊंटरमध्ये हैदराबादमधील बलात्कार आणि हत्याकांडातील चार आरोपी मारले गेले. देशभरातून यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. विशेषतः बलात्कारासारखे अनेक गंभीर गुन्हे सोशल मीडियावर अनेक नेत्यांवरही दाखल झाले आहेत. कडक कारवाई अशांवरही झाली पाहिजे अशी जोरदार मागणी होत आहे. सुब्रह्मण्यम स्वामींनीही ही मागणी नुकतीच उचलून धरली आहे.


भ्रष्ट नेत्यांवर कारवाईची मागणी स्वामींनी ट्विट करत केली आहे. विनाकारण भ्रष्ट नेत्यांबाबतीत सहिष्णुता दाखवली जात असल्यामुळे बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. प्राथमिक चौकशीत ज्या राजकीय नेत्यांवर बलात्कार किंवा हत्येचा आरोप सिद्ध झाल असेल, ताबडतोब अशा नेत्यांची हकालपट्टी केली पाहिजे. पण असे प्रत्यक्षात होताना दिसत नाही. उलट, या नेत्यांना सेलिब्रेटीचाच दर्जा मिळतो, असे ट्विट स्वामींनी केले आहे.


तत्पूर्वी उत्तर प्रदेशचा भाजप नेता कुलदीप सिंह सेंगर याच्यावर बलात्काराचा आरोप आहे. तो सध्या तिहार तुरुंगात आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त भाजप खासदार साक्षी महाराज यांनी त्याला ट्विट करत शुभेच्छा दिल्या होत्या. पण त्यांनी ते ट्विट नंतर काढून टाकले होते. काँग्रेस महासचिव प्रियांका गांधींसह अन्य विरोधी पक्षांनी नंतर भाजपला चांगलेच धारेवर धरले होते.

Leave a Comment