दिल्ली अग्नितांडवः मृतांच्या नातेवाईकांना दिल्ली सरकार देणार १० लाख रुपये


नवी दिल्ली – रविवारी पहाटेच्या सुमारास दिल्लीतील राणी झांसी रस्त्याजवळील धान्य बाजारात भीषण आग लागून ४३ जणांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. याबाबत चौकशीचे आदेश दिल्ली सरकारने दिले आहेत. घटनास्थळावर पोहोचलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की, न्यायालयीन या दुर्घटनेची चौकशी होईल. त्याचबरोबर याचा सात दिवसांच्या आत अहवाल मागितला आहे. त्याचबरोबर १०-१० लाख रुपये या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना भरपाई देण्याची घोषणाही त्यांनी केली आहे. दरम्यान, पंतप्रधान सहाय्यता निधीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही मदत जाहीर केली आहे.

धान्य बाजारात आग लागल्याची माहिती अग्निशामक दलाला पहाटे ५ वाजून २२ मिनिटांनी मिळाली. घटनास्थळी अग्निशामक दलाच्या सुमारे ३० गाड्या रवाना झाल्या. अग्निशामक दलाने घटनास्थळावरुन ५० जणांना वाचवण्यात आले आहे. जखमींना दिल्लीतील एलएनजेपी, सफदरजंग, आरएमएल आणि हिंदूराव रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Leave a Comment