तब्बल 35 वर्षांनंतर स्क्रिन शेअर करणार हे दाक्षिणात्य सुपरस्टार !


तब्बल 35 वर्षांनंतर दाक्षिणात्य सिनेसृष्टीचे दोन सुपरस्टार रजनीकांत आणि कमल हसन स्क्रिन शेअर करणार असल्याची चर्चा आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, एका चित्रपटासाठी दोघांना दिग्दर्शक लोकेश कनगराज यांनी विचारणा केली असून दिग्दर्शकाला त्यांच्याकडून होकार मिळाला आहे. पण याची अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही. या प्रोजेक्टची अधिकृत घोषणा पुढील काही महिन्यांत होण्याची शक्यता आहे. कमल हसन सध्या त्यांच्या ‘इंडियन 2’ या चित्रपटात व्यस्त आहेत, तर रजनीकांत दिग्दर्शक सिवासोबत आपल्या पुढील प्रोजेक्टवर काम करत आहेत.

कमल हसन आणि रजनीकांत यांनी अखेरचे ‘गिरफ्तार’ या चित्रपटात काम केले होते. आता 35 वर्षांचा काळ त्याला लोटला आहे. रजनी आणि कमल यांची कॅथी या चित्रपटाचे दिग्दर्शक लोकेश कनगराज यांनी भेट घेऊन चित्रपटाची कथा ऐकवली आहे. त्याचबरोबर दोन्ही स्टार्सनी कथा वाचून चित्रपटात काम करण्यास होकार दिला आहे. एकीकडे कमल ‘इंडियन 2’ या आगामी चित्रपटात व्यस्त आहेत. तर अलीकडेच ‘दरबार’ या चित्रपटाचे रजनी यांनी काम पूर्ण केले. पुढील वर्षी पोंगलच्या मुहूर्तावर ‘दरबार’ हा चित्रपट रिलीज होणार आहे. भारतीय सिनेसृष्टीतील तीन दिग्गजांनी ‘गिरफ्तार’ या चित्रपटात एकत्र काम केले होते. कमल आणि रजनी यांच्यासह बिग बी अर्थातच अमिताभ बच्चन या चित्रपटात झळकले होते.

रजनी आणि दिग्दर्शक मुरुगदास ‘दरबार’ या तामिळ चित्रपटात एकत्र काम केल्यानंतर पुन्हा एकदा एकत्र काम करु शकतात. रजनी यांच्याकडे आणखी एका चित्रपटाचा प्रस्ताव मुरुगदास यांनी ठेवला असून रजनी यांचा होकार देखील त्यांना मिळाला आहे. पण या नवीन प्रोजेक्टची तयारी ‘दरबार’च्या यशावर अवलंबून आहे.

येत्या 12 डिसेंबर रोजी सुपरस्टार रजनीकांत यांचा 68 वा वाढदिवस आहे. त्यांच्या चाहत्यांनी यानिमित्ताने तब्बल 70 दिवसांच्या सेलिब्रेशनची तयारी सुरु केली आहे. मागील गुरुवारी त्यांच्या चाहत्यांनी मंदिरात रजनी यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली. 2021 मध्ये रजनीकांत तामिळनाडूचे मुख्यमंत्री बनतील, अशी आशा त्यांच्या चाहत्यांनी व्यक्त केली आहे.

Leave a Comment