हा आहे जगातील सर्वाधिक खर्च असलेला तुरुंग


भारतीय तुरुंगांची अवस्था आपण नेहमीच ऐकतो. येथे प्रत्येक तुरुंगात क्षमतेपेक्षा अधिक कैदी भरले गेले आहेत आणि त्यामुळे त्यांना पायाभूत सुविधाही पुरेशा मिळत नाहीत. जगाच्या अन्य काही देशात या पेक्षाही वाईट अवस्थेतील तुरुंग आहेत. मात्र जगात काही अलिशान आणि आधुनिक सुविधा असलेले तुरुंगही आहेत. त्यातील सर्वात महागडा तुरुंग क्युबा येथे असून ग्वांतानामो बे जेल असे त्याचे नाव आहे. या तुरुंगात प्रत्येक कैद्यावर दरवर्षी करोडो रुपये खर्च केला जातो. येथे कैद्यांना सर्व सुविधा तसेच सुरक्षाही पुरविली जाते.


न्युयॉर्क टाईम्सच्या रिपोर्ट नुसार ग्वांतानामो खाडीवर हा तुरुंग आहे. येथे सध्या ४० कैदी असून ते अत्यंत खतरनाक गुन्हेगार आहेत. येथील प्रत्येक कैद्यावर वर्षाला ९३ कोटी रुपये खर्च केला जातो. त्यांच्या देखभालीसाठी १८०० सैनिक तैनात आहेत. म्हणजे एका कैद्यासाठी ४५ सैनिक. या सैनिकांचा वर्षाचा खर्च ३९०० कोटी रुपये होतो. अमेरिकेवरील ९/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड खलीफ शेख मोहम्मद येथेच बंद आहे.

या तुरुंगात तीन इमारती आहेत. शिवाय २ गुप्तचर मुख्यालये आणि ३ हॉस्पिटल आहेत. वकिलांना भेटण्यासाठी वेगळी व्यवस्था आहे. स्टाफ आणि कैदी याच्यासाठी चर्च, सिनेमा हॉल आहेत शिवाय खाणेपिणे, जिम, प्ले स्टेशन अश्याही सुविधा आहेत. या ठिकाणी पूर्वी अमेरिकन नौदल बेस होता तेथे आता डिटेंशन सेंटर बनविले गेले आहे.

Leave a Comment