या मद्याच्या किमती ऐकूनच येईल झीट


दारू प्यावी की पिऊ नये तसेच दारूचे आरोग्यावर होणारे वाईट परिणाम याची चर्चा नेहमीच होत असते. अर्थात अश्या चर्चा कितीही झाल्या तरी जगभर दारू प्यायली जाते आणि ज्या किमतीची दारू प्राशन केली जाते त्यावरून त्या माणसाची पत जोखली जाते हेही खरे. जगातील अनेक श्रीमंत आपल्या पाहुण्यांना अश्या महागड्या मदिरा पाजून स्वतःच्या श्रीमंतीचे प्रदर्शन करण्यात धन्यता मानतात. लग्न समारंभ, पार्टी अश्यावेळी कोणती मदिरा होती याच्या चर्चा आवडीने केल्या जातात. जगात काही मदिरा इतक्या महाग आहेत की त्यांची किंमत ऐकूनच सर्वसामान्य माणसाला झीट येऊ शकेल.


यापैकी एक आहे डाल्मोर ६२. हे आत्तापर्यंतचे सर्वाधिक महाग मद्य असून त्याच्या एका बाटलीची किंमत १ कोटी ४० लाखापेक्षा अधिक आहे. आजपर्यंत या मद्याच्या केवळ १२ बॉटल बनविल्या गेल्या आहेत.


पेनफिल्ड्स अँम्प्युल हे जगातील सर्वात महाग रेड वाईन असून ती पेन सारख्या बॉटल मध्ये विकली जाते. या बॉटलची किंमत आहे १ कोटी ११ लाख.


अम्मंड डी ब्रिगनॅक मिडास हे जगातील सर्वात महाग दारू असून तिची किंमत १ कोटी ४० लाख आहे.


डीवा व्होडका या मद्याची चव नेलपॉलिश सारखी असून या बाटलीत स्वरोवास्कीचे क्रिस्टल असतात. हे क्रिस्टल घालून ही व्होडका पिता येते.


टकीला ले ९२.५ या मद्याच्या बाटलीवर ६४०० हिरे जडविले गेले आहेत. मेक्सिकोत ती प्रथम सादर केली गेली मात्र आजपर्यंत ती कुणीच खरेदी न केल्याने तिची किंमत समजू शकलेली नाही.

Leave a Comment