या देशात महिला चालवत आहेत ‘नो मॅरिज वूमन’ अभियान

दक्षिण कोरिया आणि जापानमध्ये महिला लग्न करत नसल्याने आर्थिक संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. येथे महिलांचे असे अनेक समूह आहेत जे लग्न करण्यास व आई होण्यास तयार नाहीत. हे दोन्ही देशांचा सर्वात कमी जन्म दर असलेल्या देशांच्या यादीत समावेश झाला आहे. यामध्ये जापान पहिल्या तर दक्षिण कोरिया 8व्या स्थानावर आहे.

कोरियामध्ये तर महिला हॅशटॅग नो मॅरिज वूमन अभियान चालवत आहेत. या अभियानात महिलांना डेटिंग, सेक्स, लग्न आणि मुले या गोष्टींपासून लांब राहण्यास सांगण्यात येत आहे.

महिला लग्न करत नसल्याने येथील अनेक मॅरिज हॉल बंद झाले आहेत. येथील सरकार या गोष्टींने एवढी चिंतित आहे की, ते लग्नाला प्रोत्साहन देत आहेत व पैसे देत आहेत. दक्षिण कोरियात दशकापुर्वी 47 टक्के महिलांचे लग्न गरजेचे असल्याचे मत होते. मात्र आता केवळ 22.4 टक्के महिलाच या गोष्टीला मान्यता देतात. येथे सरकार लग्न करण्यासाठी व वडील बनण्यासाठी प्रोत्साहन योजना चालवत आहे.

कोरियाच्या सियोल येथे 20 टक्के मॅरिज हॉल बंद झाले आहेत. अनेक शाळांमध्ये मुलांची संख्या कमी झाल्याने शाळा देखील बंद करण्यात आल्या आहेत.

जापानची लोकसंख्या देखील वेगाने वृद्धत्वाच्या दिशेने जात आहे. यामुळे समाज आणि अर्थव्यवस्था दोन्हींवर परिणाम होत आहे.  याच कारणांमुळे महिलांवर दुसरे मुल जन्माला घालण्यासाठी दबाव टाकण्यात येत आहे. जेणेकरून युवा जनसंख्या वाढवता येईल.

Leave a Comment