या पठ्ठ्याने तब्बल 55 चौकार, 52 षटकारच्या मदतीने कुटल्या 585 धावा


नवी दिल्ली : गाझियाबाद येथील एक शाळेतील विद्यार्थ्याने क्रिकेटमध्ये असे काही केले की ज्यामुळे अवघ्या देशाचे लक्ष त्याने आपल्याकडे वेधले आहे. या विद्यार्थ्याने शहीद राम प्रसाद विस्मिल स्मृती क्रिकेट सामन्यात तब्बल 585 धावा केल्या. आपल्या खेळी दरम्यान त्याने 55 चौकार आणि 52 षटकार 167 चेंडूत केल्या आहेत. या विद्यार्थ्याचे स्वास्तिक चिकारा असे नाव आहे.

स्वास्तिकने हा कारनामा माही क्रिकेट अकादमीकडून गोरखपूरच्या एसीई क्रिकेट अकादमीच्या विरोधात खेळताना केला. यावेळी माही अकदामीने एसीई क्रिकेट अकादमीचा 355 धावांनी पराभव केला. गाझीयाबादच्या दीवान क्रिकेट स्टेडिअयवर हा सामना खेळवण्यात आला. स्वास्तिकने प्रीतसोबत पहिल्या विकेटसाठी 527 धावांची भागीदारी केली. प्रीतने यामध्ये 48 धावा केल्या. तर स्वास्तिकने 167 चेंडूत 585 धावा करत तुफानी फलंदाजी केली.

या तुफानी खेळादरम्यान 55 चौकार आणि 52 षटकार त्याने ठोकत विरोधी संघाला घाम फोडला. स्वास्तिकच्या या तुफानी खेळामुळे संघाने 38.2 षटकात 704 धावांचा डोंगर रचला. एसीईचा गोलंदाज सोनूने 77 धावांत 4 गडी बाद केले. लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या एसई संघ 40 षटकात 7 गडी गमावत 349 धावा बनवू शकला. स्वास्तिक यापूर्वीही आपल्या तुफानी खेळीमुळे चर्चेत राहीला आहे. यापूर्वीही त्याने शालेय क्रिकेटमध्ये सर्वाधिक 356 धावा करत विक्रम रचला होता. त्याने आतापर्यंत 22 द्विशतक आणि 7 त्रिशतक केले आहेत.

Leave a Comment