या अभिनेत्रीने बॉलीवूड प्रवेशाआधी केले आहे बेबी सीटरचे काम - Majha Paper

या अभिनेत्रीने बॉलीवूड प्रवेशाआधी केले आहे बेबी सीटरचे काम


कोणत्या ना कोणत्या नव्या चेहऱ्याचे बॉलीवूडमध्ये प्रवेश होत असतो. त्यातील काही चेहरे यशस्वी होतात तर काही अयशस्वी होतात. त्यातच स्टारकिड्सच्या बॉलीवूड होणाऱ्या प्रवेशामुळे अनेक नवीन कलाकारांना खूप घाम गाळावा लागतो. त्यातीलच एक नाव म्हणजे कियारा अडवाणी हे आहे. कबीर सिंहला मिळालेल्या अभूतपुर्व यशानंतर तिच्याकडे बहुतेक निर्मात्यांचे लक्ष आहे. लवकरच तिचा ‘गुड न्यूज’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. पण बॉलीवूड प्रवेशाआधी कियारा नोकरी करत होती. कियाराने या गोष्टीचा खुलासा ‘गुड न्यूज’ चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान दिलेल्या एका मुलाखती दरम्यान केला.


कियाराने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ती बॉलीवूड प्रवेशाआधी ती काय काम करायची याविषयी सांगितले. कियाराने बॉम्बे टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत बॉलिवूडमध्ये येण्याआधी ती लहान मुलांना सांभाळण्याचे म्हणजे बेबी सीटिंगचे काम करत असे याचा खुलासा केला. ती म्हणाली, माझ्या आईचे एक प्री स्कूल होते. बॉलिवूडमध्ये येण्याआधी माझी पहिली नोकरी मी आईच्या शाळेमध्ये केली होती. मी तिथे सकाळी 7 वाजता जात असे आणि लहान मुलांची देखभाल करत असे.


कियारा पुढे म्हणाली की, लहान मुलांना सांभाळायचे सर्व कामे मी केली आहेत. नर्सरीमध्ये मी कविता म्हणत असे, त्यांना अल्फाबेट्स आणि नंबर्स शिकवत असे. त्यांचे डायपर्स सुद्धा मी बदलले आहेत. लहान मुले मला फार आवडतात. कियारा म्हणते मी एक दिवस आई होईन माझे बाळ असेल आणि हा जीवनातील सर्वात सुंदर क्षण असतात.


कियाराचा ‘गुड न्यूज’ 27 डिसेंबरला रिलीज होत आहे. करण जोहरची निर्मिती असलेल्या या चित्रपटात कियारासोबतच अक्षय कुमार, करिना कपूर, दिलजीत दोसांझ यांच्या प्रमुख भूमिका आहेत. याशिवाय कियारा अक्षय कुमार सोबत ‘लक्ष्मी बॉम्ब’ या चित्रपटात दिसणार आहे.

Leave a Comment