जगातील सर्वात मोठ्या तेल कंपनीत भागीदार होण्याची संधी, कंपनीने जारी केले ‘आयपीओ’

सौदी अरेबियात स्थित जगातील सर्वात मोठी तेल उत्पादक कंपनी ‘अरामको’ने गुरूवारी आपला आयपीओ जारी केला आहे. कंपनीचे मुल्यांकन तब्बल 1.7 ट्रिलियन डॉलर एवढे आहे. आयपीओद्वारे कंपनी 25.6 अब्ज डॉलर भांडवल गोळा करणार आहे.

हा जगातील सर्वात मोठा आयपीओ आहे. आता अरामको बाजार मूल्यानूसार अ‍ॅपलला मागे टाकून जगातील सर्वात मोठी कंपनी झाली आहे. कंपनीने जवळपास 1.5 टक्के शेअर विक्रीस काढले आहेत.

अरामकोच्या शेअर्सची ट्रेंडिंग पुढील आठवड्यापासून सुरू होईल. याची घोषणा रियाद स्टॉक एक्सचेंजकडून होईल. मात्र अरामकोने याआधीच जाहीर केले आहे की, शेअर अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनेडा आणि जापानमध्ये विकले जाणार नाहीत.

आयपीओ म्हणजे काय ?

जेव्हा कोणतीही कंपनी पहिल्यांदा बाहेरील नागरिक, संस्थांसाठी आपले शेअर विक्री करण्याचा प्रस्ताव ठेवते, तेव्हा या प्रक्रियेला इनिशियल पब्लिक ऑफर (आयपीओ) अर्थात प्राथमिक समभाग विक्री म्हटले जाते. जेव्हा तुम्ही हे शेअर्स खरेदी करता, त्यावेळी तुम्ही कंपनीचे भागीदार असता.

Leave a Comment