कल्कीचे बेबी बंपसह फोटोशूट - Majha Paper

कल्कीचे बेबी बंपसह फोटोशूट


बॉलिवूड अभिनेत्री कल्की कोचलिन लवकरच तिच्या चाहत्यांना गुड न्यूज देणार आहे. आपल्या इस्रायली पियानो वादक बॉयफ्रेंड गाय हर्शबर्ग याच्यापासून कल्कि पहिल्या बाळाला जन्म देणार आहे. ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला तिने तिच्या प्रेग्नन्सीची माहिती चाहत्यांना दिली होती.


कल्किने नुकतेच आपल्या बेबी बंपसह फोटोशूट केले आहे. ग्राझिया मासिकाच्या डिसेंबर महिन्याच्या कव्हरपेजसाठी कल्किने हे खास फोटोशूट केले असून तिने यातील काही फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.


कल्किने या फोटोशूटसाठी ऑफ व्हाइट कलरचा ड्रेस घातला होता. या फोटोशूटमध्ये तिचा फॅशन सेन्स खूप चांगला हे दिसून येते. तिने प्रेग्नन्सीमध्येही तिचे स्टाइल स्टेटमेंट व्यवस्थित सांभाळले आहे.


कल्किने हे फोटो शेअर करताना त्याला एक सुंदर कॅप्शन सुद्धा दिले आहे. तिने लिहिले, स्वतःचे प्रतिनिधित्व करणे हे माझे काम आहे. माझे कामच माझ्यासाठी बोलेल.


जेव्हा पहिल्यांदा तिच्या प्रेग्नन्सीबद्दल कल्किने सांगितले तिने त्यावेळी ती डिलिव्हरीसाठी वॉटरबर्थ पद्धतीचा वापर करणार असल्याचे स्पष्ट केले होते. दरम्यानच्या काळात तिने बेबी बंपसोबत अनेक फोटो शेअर केले आहेत.


कल्किने बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यपपासून घटस्फोट घेतल्यानंतर सप्टेंबर 2019 मध्ये पहिल्यांदाच तिचा बॉयफ्रेंड गाय हर्शबर्गसोबतच्या नात्याबद्दल सोशल मीडियावरुन माहिती दिली होती. त्यानंतर ऑक्टोबरमध्ये तिने ती आई होणार असल्याचे स्पष्ट केले.

Leave a Comment