अवघ्या 3 रुपयात होऊ शकते ऑनलाइन फसवणुकीपासून बचाव


मुंबई : सध्याच्या डिजीटल युगात आपल्यापैकी अनेकजण ऑनलाईन खरेदी आणि पैसे देण्याचे काम करतात. पण यामुळे अनेकांची ऑनलाईन फसवणूक देखील होत आहे. ग्राहकांची वेगवेगळ्या माध्यमातून आर्थिक फसवणूक केली जात असून त्यांच्या बँकेतील खात्यातील अथवा ऑनलाइन अॅपद्वारे खात्यातून पैसे गायब होत असल्यामुळे सायबर सुरक्षा ही आताच्या काळात ग्राहकांसाठी महत्त्वाची गरज होत आहे. तुमच्या खात्यावरचे पैसे तुम्ही इन्शुरन्सच्या सहाय्याने सुरक्षित करु शकता. नेमकी कशी आहे ही पॉलिसी आणि काय आहेत त्यासाठी नियम याची माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत.

अवघ्या तीन रुपयात तुम्ही ह्या पॉलिसीच्या माध्यमातून 50 हजारांचा विमा काढू शकता. ही पॉलिसी तुमचे वेगवेगळ्या सायबर क्राइमपासून संरक्षण करते. या पॉलिसीमध्ये खोटे होणारे ऑनलाइन गैरव्यवहार, फिशिंग, ईमेल स्पूफिंग, ई-एक्सटॉर्शनमार्फत केली जाणारी चोरी आणि सायबर बुलिंगचा समावेश आहे. ही खास पॉलिसी HDFC ERGO या कंपनीकडून देण्यात येत आहे. ही पॉलिसी सर्वसामान्य नागरिकांची सायबर फ्रॉड आणि डिजिटल धमकी किंवा सायबर अॅटॅकपासून संरक्षण करण्यासाठी आणि ग्राहकांची होणारी फसवणूक रोखण्यासाठी मदत करणार आहे. ग्राहकांचे झालेले नुकसान या पॉलिसीद्वारे भरून निघणार असल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे.

HDFC ERGO कंपनीच्या एमडीच्या म्हणण्यानुसार भारताचा ऑनलाइन आर्थिक व्यवहारांमध्ये जगात दुसरा क्रमांक लागतो. त्यामुळे साहाजिकच सायबर क्राइमचे प्रमाणही वाढले आहे. यापासून वाचण्यासाठी अथवा फसगत झाल्यास त्यातून तुमचे नुकसान भरुन काढण्यासाठी ही पॉलिसी आगामी काळात अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. यासाठी तुम्हाला HDFC ERGO कंपनीची पॉलिसी काढवी लागणार आहे. त्याचबरोबर दिवसाकाठी तीन रुपये भरावे लागणार आहेत.

Leave a Comment