नवीन आयफोनमध्ये नसणार चार्जिंग पोर्ट, असा होणार फोन चार्ज

वर्ष 2021 मध्ये लाँच होणाऱ्या आयफोनमध्ये मोठे बदल दिसणार आहेत. आतापर्यंत 2021 मध्ये लाँच होणाऱ्या आयफोनच्या डिझाईन आणि साइजबद्दल रिपोर्ट्स समोर येत होते, मात्र आता रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, नवीन आयफोनमध्ये चार्जिंग पोर्ट मिळणार नाही. याची माहिती अ‍ॅपलचे एनालिस्ट मिंग-ची कुओ यांनी दिली आहे.

मिंग यांचा एक लेख 9to5Mac मध्ये प्रकाशित झाला आहे. यानुसार, वर्ष 2021 मध्ये लाँच होणाऱ्या आयफोनमध्ये लायटेनिंग पोर्ट नाही मिळणार. चार्जिंग पोर्ट पुर्णपणे काढूनच टाकण्यात आलेले आहे.

त्यामुळे नवीन आयफोन केवळ वायरलेस चार्जिंग सपोर्ट असेल. जर खरेच असे झाले तर अ‍ॅपलद्वारे कोणत्याही प्रोडक्टमध्ये करण्यात आलेला हा सर्वात मोठा बदल असेल.

आयफोनमध्ये चार्जिंग पोर्ट नसल्याने, डिझाईनमध्ये देखील मोठे बदल दिसतील. चार्जिंग पोर्ट नसल्याने डेटा ट्रांसफर देखील वायरलेसच करावे लागेल.

 

Leave a Comment