स्पॅम कॉलला वैतागले असाल, तर करा हे उपाय

काही दिवसांपुर्वीच ट्रकॉलर अ‍ॅपच्या रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, प्रत्येक भारतीयाला मोबाईलवर महिन्याभरात कमीत कमी 25 स्पॅम कॉल येतात. स्पॅम कॉल आणि मेसेजची संख्या अनेक पटींनी वाढली आहे. जर तुम्ही देखील तुमच्या फोनवर येणाऱ्या अनोळखी कॉलला वैतागले असाल, तर यावर नियंत्रण मिळवण्यासाठी तुम्ही काही खास अ‍ॅप्सचा वापर करू शकता.

कॉल ब्लॉकिंग अ‍ॅप्स –

प्ले स्टोरवर अनेक कॉल ब्लॉकिंग अ‍ॅप्स मिळतील. हे अ‍ॅप्स लाखो नंबरच्या डेटाबेसवर निर्भर असतात. जर या डेटाबेसमधील नंबरवरून तुम्हाला कॉल आल्यास हे अ‍ॅप्स त्वरित तुम्हाला माहिती देते. गुगल फोन, हिया, ट्रूकॉलर, मि. नंबर, शूड आय अन्सर ? हे अ‍ॅप तुम्ही डाउनलोड करू शकता. यातील काही अ‍ॅप्स फ्री आहेत, तर काहींना स्बस्क्राईब करावे लागते.

जर तुम्हाला काही ठराविक नंबर अथवा कंपन्या त्रास देत असतील तर त्यांचे नंबर तुम्ही थेट मोबाईलवरच ब्लॉक करू शकता. यासाठी कोणत्याही अ‍ॅपची गरज देखील नाही. तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये जावून तुम्ही नंबर ब्लॉक करू शकता. हा उपाय जेव्हा तुम्हाला अगदीच मोजके स्पॅम कॉल येत असतील तेव्हाच फायदेशीर आहे.

याशिवाय तुम्ही तुमचा नंबर डू नॉट डिस्ट्रब डायरेक्ट्रीमध्ये रजिस्टर करू शकता. यासाठी तुम्हाला START 0 हा मेसेज 1909 वर पाठवावा लागेल.

 

Leave a Comment