दोषी बलात्काऱ्यांना महिन्याभरात फासावर चढवा – खासदार नुसरत जहां


नवी दिल्ली : हैदराबादमधील डॉक्टर तरुणीचा सामूहिक बलात्कारनंतर करुन हत्या आणि उन्नावमधील बलात्कार पीडितेला जिवंत जाळल्याची घटना नुकतीच समोर आल्यानंतर देशभरातील वातावरण ढवळून निघाले आहे. त्यातच यावर एक जालीम तोडगा अशातच प्रसिद्ध बंगाली अभिनेत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहां यांनी सुचवला आहे. दोषी बलात्काऱ्यांना महिन्याभरात फासावर चढवा, अशी मागणी खासदार नुसरत जहां यांनी केली आहे.


सर्वसामान्यांपासून राजकीय क्षेत्रातील आणि क्रीडा क्षेत्रापासून मनोरंजन विश्वातील अनेक जणांनी हैदराबाद आणि उन्नावमधील घटनांनंतर प्रतिक्रिया दिल्या आहेत. देशातील बलात्काराच्या वाढत्या घटनांवर नुसरत जहां यांनीही संताप व्यक्त केला आहे. नुसरत जहां यानी आपला राग ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केला आहे. आपल्या ट्विटमध्ये नुसरत म्हणतात की, नाही म्हणजे नाही. कायदा कितीही कठोर असला तरी प्रशासन आणि पोलिसांना जबाबदारीने वागायला पाहिजे. जामीन नको. माफी नको. दोषी ठरल्यास एका महिन्यात फासावर लटकवा.

Leave a Comment