चक्क दोन आईच्या गर्भात वाढले बाळ

ब्रिटनच्या एस्केक्स कोलचेस्टर येथे राहणाऱ्या एका लेस्बियन कपलने शेअर्ड मदरहूड प्रक्रियेद्वारे बाळाला जन्म दिला आहे. म्हणजे जन्माच्या आधी बाळ दोन्ही आईच्या गर्भात वाढले. डॉक्टरांचा दावा आहे की, ब्रिटनमध्ये पहिल्यांदाच असे घडले आहे. ब्रिटिश कपल जॅस्मिन (28) आणि डोना फ्रांसिस स्मिथ (30) यांच्या बाळाचा जन्म सातव्या महिन्यातच झाला.

बाळाचा जन्म एनी व्हिवो नॅच्युरल फर्टिलायजेशन प्रक्रियेद्वारे झाला. या प्रक्रियेत अंडे एका गर्भात वाढते व त्यानंतर अंड्याला दुसऱ्या आईच्या शरीरात प्रत्योरोपण केले जाते. याच्या उलट आयव्हीएफमध्ये ही प्रक्रिया शरीराच्या बाहेर होते. लंडन वूमन क्लिनिकच्या आयव्हीएफ तज्ञांनी 8 वर्षांपुर्वी लेस्बियन जोडप्यांसाठी शेअर मदरहूड आयडिला लाँच केली होती. तेव्हापासून आतापर्यंत 100 बाळांचा जन्म शेअर मदरहूडद्वारे झाला आहे.

डोनाने 11 वर्ष सैन्यात काम केले. तिने सैन्यात असताना अफगाणिस्तान आणि सायप्रस येथे देखील कार्य केले. डोना आणि डेंटल नर्स असलेल्या जॅस्मिनची भेट 2014 ला झाली होती. त्याच वर्षी दोघींनी लग्न केले होते.

डोना यावर म्हणाली की, त्यांना ही प्रक्रिया माहिती होती. या प्रक्रियेत ती केवळ गर्भवती झाली. मात्र बाळाला जन्म जॅस्मिनने दिला.

Leave a Comment