अमेरिकेतील पोस्ट ऑफिसला देणार ‘त्या’ शीख पोलीस कर्मचाऱ्याचे नाव

अमेरिकेच्या टेक्सास येथे दोन महिन्यांपुर्वी हेट क्राइममधून शीख पोलीस कर्मचारी संदीप धालीवाल यांना जीव गमवावा लागला होता. त्यांना सन्मान देणयासाठी अमेरिकेत संसदेत विधेयक सादर करण्यात आले. या अंतर्गत ह्युस्टनच्या एका पोस्ट ऑफिसचे नाव बदलून त्या जागी संदीप सिंह धालीवाल यांचे नाव देण्याचा प्रस्ताव आहे. अमेरिकेचे खासदार लिजी फ्लेचर यांनी हाउस ऑफ रिप्रेजेटिंटिव्हसमध्ये हे विधेयक सादर केले.

ते म्हणाले की, धालीवाल यांनी टेक्सासमध्ये समानता, नाती आणि समुदायासाठी काम केले आणि आपले जीवन दुसऱ्यांच्या सेवेसाठी सोपवले. त्यामुळे हे पोस्ट ऑफिस नेहमी त्यांची सेवा आणि बलिदानाची आठवण देत राहील.

डिप्टी धालीवाल यांची 27 सप्टेंबरला टेक्सास येथे ट्रॅफिक ड्यूटी दरम्यान गोळी घालून हत्या करण्यात आली होती. धालीवाल यांनी तपासासाठी कार थांबवली होती. या कारमध्ये एक महिला आणि एक पुरूष होता. हल्लेखोरांनी गाडीतून बाहेर येत धालीवाल यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या.

संदीप सिंह धालीवाल हे 2015 मध्ये पोलिसात दाखल झाले होते. त्यांना धर्माशी संबंधित प्रतिक आणि पगडी-दाढी ठेवून पोलीस सेवा करण्याची संधी देण्यात आली होती. त्यांच्यासाठी नियमांमध्ये देखील बदल करण्यात आला होता.

Leave a Comment