एअरटेलने मान्य केली अ‍ॅपमध्ये ‘बग’ असल्याची बाब

देशातील तिसरी सर्वात मोठी दूरसंचार कंपनी एअरटेलने आपल्या अ‍ॅपमध्ये त्रुटी असल्याची बाब मान्य केली आहे. रिपोर्टनुसार, एअरटेल अ‍ॅपच्या अ‍ॅप्लिकेशन प्रोग्राम इंटरफेसमध्ये (एपीआय) बग आढळला होता. याद्वारे हॅकर्स युजर्सच्या नंबर्सच्या आधारावर त्यांची खाजगी माहिती चोरी करू शकत होते. मात्र अद्याप डेटाबरोबर छेडछाड केल्याचे प्रकरण समोर आलेले नाही. बगमुळे कोट्यावधी युजर्सचे नाव, ईमेल, जन्मतारीख, पत्ता ही माहिती लीक होण्याचा धोका होता.

एअरटेलच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, अ‍ॅपमधील बगची समस्या सोडवण्यात आलेली आहे. कंपनीचे डिजिटल प्लॅटफॉर्म सुरक्षित आहेत. ग्राहकांची खाजगी माहिती कंपनीसाठी सर्वात महत्त्वाची आहे.

सप्टेंबर 2019 पर्यंत एअरटेलचे 32.50 कोटी एक्टिव युजर्स आहेत. एअरटेल व्होडाफोन-आयडिया आणि रिलायन्स जिओनंतर सर्वात मोठी दूरसंचार कंपनी आहे. याचवर्षी ऑक्टोंबरमध्ये लोकल सर्च सर्विस जस्टडायलच्या एपीआयमध्ये बग आढळला होता. त्यामुळे अ‍ॅपच्या 15 कोटी युजर्सची माहिती लीक झाली होती.

 

Leave a Comment